चौल नाक्यावर पहिलाच पावसात खड्डे समस्या
चौल नाक्यावर पहिलाच पावसात खड्डे समस्या
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल नाक्यावर गेल्या वर्षी पावसाळयातील पडलेले खड्डे अदयापी तसेच असल्याने, व रस्ताचे नुतनीकरण न केल्याने पहिलाच पावसात खड्डे समस्येने वाहने व प्रवासीवर्गाचे बेहाल होत असल्याचे चित्र दिसले.
अलिबाग तालुक्यातील चौल हे अलिबाग तालुक्यातील संवेदनशील गाव आहे, येथूनच पुढे मुरूड तालुक्यात जाता येते, तसेच मुरूड तालुक्यातील वाढते उदयोग व्यवसाय व वाढती पर्यटन यांने या रस्तावरची लहान मोठी वहातुक वाढली असून मिनिटागणीत वाहने येथून जा-ये करत असतात. चौल नाक्यावरील रस्ताची गतवर्षीच पावसाळयात दुरावस्था झाली आहे, मात्र संबधीतानी केलेल्या दुर्लक्षतेने रस्ता नुतनीकरण झालेच नाही. परिणाम मागील पावसाळयातील खड्डे तसेच रस्तावर दिसून येतात.
पावसाच्या पहिल्याच सरीने खड्डे पाण्याने भरून गेले असून येथून जा-ये करत असलेल्या लहान मोठया वाहनांना रस्ताच्या मधोमध पडलेले खड्डे खुप त्रासदायक ठरत आहेत. येथून जा-ये करत असलेल्या वाहतुकीवर परिणाम दिसून येतो. चौल नाक्यावर रस्ताच्या मधोमध पडलेले भले मोठे खड्डे चुकविताना वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लहान वाहनाना या खड्डाचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो, प्रवासीवर्गाला सुध्दा या खड्डातून प्रवास करताना, त्रासदायक ठरते.
चौल ते बेलोशी रस्ताचे नुतनीकरणाचे कामाची मंजूरी झाली असून रेवदंडा येथे उपमुख्यमंत्री ण्कनाथ शिंदे यांनी रेवदंडा येथे श्रीफळ वाढवून या कामांचे भुमिपुजन केले आहे. मात्र अदयापी या कामाची सुरूवात चौल नाका येथून झालेली नसल्याचे दिसते. संबधीताना पावसाळयापुर्वीच या चौल नाका येथील रस्ता नुतनीकरणाचे काम पुर्ण करावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. अन्यथा गतवर्षीप्रमाणेच चौल नाक्यावरील प्रवास वाहनासाठी व प्रवासीवर्गासाठी खड्डातून करावा लागेल.