मंत्ररलेले विटा व ताबीज देणारा मांत्रीक अखेर गजाआड
ताडगांव प्रकरणातील जादुटोणा व भगतगिरी संबधीत
मंत्ररलेले विटा व ताबीज देणारा मांत्रीक अखेर गजाआड
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुलीने प्रियकराचा नाद सोडावा म्हणून दोघानी जादुटोणा करत मंतरलेले ताबीज बांधून मौजे ताडगाव येथील सार्वजनिक विहीरीत टाकल्यासंबधीत रेवदंडा पोलिस ठाणे येथे मांत्रिकासह एकूण तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. यामधील मांत्रिकाला कल्याण-पश्चिम गोंविदनगर येथून रेवदंडा पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणातील अखलास खान वय 47 वर्षे, व महिलेचे नाव सेमा खान वय वर्षे 47 असून ते दोघेही पतीपत्नी असून नवी मुंबई नेरूळ येथील रहिवाशी आहेत. त्यांना मौजे ताडगाव गावाचे सार्वजनिक विहीरीवर रविवार दि. 11 मे 2025 रोजी सकाळी अकराचे सुमारास, एक व्यक्ती विहीरीत काहीतरी टाकत असल्याचे ग्रास्स्थ हरिश्चंद्र पाटील यांचे निदर्शनास येताच त्यांनी तेथेच माजी मुरूड पं.स. उपसभापती चद्रकांत मोहिते यांना माहिती दिली. त्या व्यक्तीस हरिश्चंद्र पाटील व चंद्रकांत मोहिते यांनी हटकले, व विचारणा केली, त्यावेळी सदर व्यक्तीने विहीरीत काहीतरी टाकल्याचे निदर्शनास आले. सध्याच्या पाकिस्तान विरोधात सुरू असलेल्या युध्दजन्य परिस्थितीने ग्रामस्थांच्या मनात विहीरीत विष टाकल्याची शंका निर्माण झाली. त्यामुळे रेवदंडा पोलिसांना ही बाब कळविण्यात आली होती. यावेळी मोठया संख्येने साळाव ते ताडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते.
त्यांनी मुंलीने तिच्या प्रियकराचा नाद सोडावा म्हणून जादुटोणा करणारा मांत्रिक मौलाना खलिय राहणार गोंविदनगर कल्याण-पश्चिम, यांचेशी आपसात संगणमत करून त्याचेकडून जादुटोणा करून मंतरलेल्या ताबीज बांधून घेतलेल्या पाच विटा त्यांनी नेरूळ येथून रेवदंडा येथे सोबत आणून साळाव ब्रिज ते ताडवाडी या मुरूड तालुक्यातील दरम्यानच्या गावातील रस्ता लगत असलेल्या सार्वजनिक विहीरीत सदरच्या जादुटोणा करून मंतरलेल्या, ताबीज बांधलेली प्रत्येकी एक विट, विहीरीच्या पाण्यात टाकून तसेच येथील जनतेच्या आरोग्यास अपाय व्हावा,या करीता विभूती सदृश्य आणखी काहीतरी दुष्ज्ञीत वस्तू पाण्यात टाकून विहीरीचे पाणी दुषीत करून सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशत व घबराहट निर्माण होईल असे अघोरी कृत्य केले म्हणून रेवदंडा पोलिसांत चंद्रकांत मोहिते यांनी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणातील अखलास खान वय 47 वर्षे, व महिलेचे नाव सेमा खान वय वर्षे 47 यांना रेवदंडा पोलिसांनी अगोदरच अटक केली आहे. तर जादुटोणा करणारा मांत्रिक मौलाना खलिय राहणार गोंविदनगर, कल्याण-पश्चिम या आरोपीस रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज सपोनि श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक शिवकुमार नंदगावे, पोलिस हवालदार मनिष ठाकूर, पोलिस शिपाई पंजाबराव घोले यांनी गोंविदनगर, कल्याण-पश्चिम येथे अटक करून रेवदंडा पोलिस ठाणे येथे आणले.
याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे नेरूळ नवी मुंबई येथील अखलास खान, सेमा खान तसेच कल्याण गोविंदनगर येथील मौलवी खलिय या तिघांवर रेवदंडा पोलिस ठाणे येथे भा.न्या.स. कलम 279, 3(5),महाराष्ट्र अंधश्रध्दा व जादुटोणा अधिनियम 2013 चे कलम 3(1)(2), प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे सपोनि श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.