ताज्याघडामोडी

रेवदंडा तलाठयास लाच घेताना रंगेहाथ पकडले

रेवदंडा तलाठयास लाच घेताना रंगेहाथ पकडले
रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे महसुल कार्यालयातील तलाठयास लाच घेतली म्हणून तसेच मंडळ अधिकारांस लाच मागितली म्हणून रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
रेवदंडा आगरकोट सर्वे नं. 20/1,20/2,21/1,21/3,21/4,23/5 या जमीनीचे सातबारा उतारावर वारस नोंदी करता, पाच हजार रूपयांची लाच स्विकारताना, महिला तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ, व लाच मागितली म्हणून मंडळ अधिकारी विजय विश्‍वनाथ मापुसकर यांना रेवदंडा महसुल कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांनी दि. 7 मे 2025 रोजी सायकांळी 4.00 चे सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक शशिकांत पाडावे यांचे नेतृत्वााखाली विनोद जाधव, अरूण करकरे, महेश पाटील, सुषमा राउळ, आणि सागर पाटील यांनी सहभाग घेतला. याबाबतची फिर्याद बोर्ली येथील धनेश श्रीकत वैदय यांनी केली होती.
तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या महिलेची जमीन मौजे आगरकोट, रेवदंडा ता. अलिबाग येथे असून जमिनीचे सातबारा उतारावर वारस नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी संबधीत कागदपत्रे जमा करण्यासाठी तक्रारदार धनेश वैदय हे दि. 5 मे 2025 रोजी चौल मंडळ अधिकारी विजय महापुसकर व महिला तलाठी वसुंधरा धुमाळ यांच्या कार्यालयात गेले होते, यावेळी दोघानींही सातबारा उतार्‍यावर वारस नोंद करण्यासाठी प्रत्येक 5 हजार रूपये, असे एकूण 10 हजार रूपयेांची लाच मागितली अशी तक्रार धनेश वैदय यांनी 6 मे 2025 रोजी रायगड लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती.
तक्रारीच्या अनुंषगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 6 मे 2025 रोजी पडताळणी केली असता, मंडळ अधिकारी व महिला तलाठी यांनी लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार 7 मे 2025 रोजी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्याने तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी पाच हजाराची लाच साक्षीदाराच्या उपस्थितीत स्विकारली. लाच स्विकारल्यानंतर त्या कार्यालयातून निघण्याचा तयारीत असताना, तक्रारदाराच्या इशार्‍यावरून त्यांना त्यांना लाचेच्या रक्‍कमेसह ताब्यात घेण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी विजय महापुसकर यांनी स्वतःसाठी मागितलेली 5 हजाराची रक्‍कम नंतर आणण्याचा संकेत दिला होता. त्यांनीही लाच मागणी केल्या त्यानाही पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *