ताज्याघडामोडी

रेवदंडयाचे क्रिडा शिक्षक दिपक मोकल कोहिनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

रेवदंडयाचे क्रिडा शिक्षक दिपक मोकल कोहिनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
रेवदंडा-महेंद्र खैरे-नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) याच्या वतीने रेवदंडयाचे दिपक मोकल यांची क्रिडा क्षेत्रातील कार्याची दखल घेवून महाराष्ट्र दिनाचे निमित्‍ताने कोहिनुर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) नाशिक याच्या वतीने विविध क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य करणार्‍या कर्तृत्वान महिला/पुरूष यांलर कोहिनुर या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात येते. संस्थेचे अध्यक्ष डाँ. महेंद्र देशपांडे यांनी रेवदंडयाचे क्रिडा क्षेत्रातील कोहिनुर दिपक गजानन मोकल यांची क्रिडा क्षेत्रातील उल्‍लेखनिय कार्याची दखल घेवून त्यांना कोहिनुर या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दि. 4 मे 2025 रोजी सायकांळी 5.30 वाजता विशाखा हॉल, कुसूमाग्रज स्मारक, गंगापुर रोड, नाशिक येथे संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी नाशिक पोलिस आयुक्‍त संदिप कर्णिक, धुळे लोकसभा सदस्य शोभाताई बच्चाव, फौजदारी व सायबर कायदे तज्ञ अ‍ॅड अदैत चव्हाण, संपादक मंदार फडके, मिसेस युनिव्हर्स व मिसेस दुबई ज्योती केदारे, लोकप्रिय अभिनेते पवन चोरे, प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक दिपक चांदे, समाजसेवक जयेशजी ठक्‍कर, डॉ.यु.के.शर्मा, डॉ. ललित बददानिया या मान्यवरांचे उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे निमत्रंक संस्थेचे अध्यक्ष डाँ. महेद्र देशपांडे होते. या कार्यक्रमात रेवदंडयाचे दिपक मोकल यांना संस्थेचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे व मिसेस युनिव्हर्स व मिसेस दुबई ज्योती केदारे यांचे हस्ते स्मृती चिन्ह व शाल,श्रीफळ, पुष्पगूच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
रेवदंडा येथील कायम रहिवाशी असलेले दिपक मोकल यांचे मुळ गाव पेण तालुक्यातील बेनवले आहे. अलिबाग को.ए.सो. संकुलात नोकरी करत असताना तिस वर्षे त्यांनी क्रिडा क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून योगदान दिले, त्यांनी बामणगांव येथील रामभाउ पाटील को.ए.सो. हायस्कुल येथे मुख्याध्यापक असताना सेवा निवृत्‍ती घेतली. सेवा निवृत्‍ती नंतरही त्यांनी क्रिडा प्रशिक्षक म्हणून अखंड काम सुरू ठेवले. सध्या ते डायरेक्ट हॉलिबॉल असोसिएशनच महाराष्ट्रचे जनरल सेके्रटरी व डायरेक्ट हॉलिबॉल फेडरेशन इंडियाचे जनरल सेके्रटरी म्हणून क्रियाशील आहेत. दिपक मोकल क्रिडा शिक्षक तसेच राष्ट्रीय कबड्डी पंच कार्यरत असताना ग्रामीण भागातील क्रिडा संस्थामध्ये कबड्डी,खो-खो,हॅण्डबॉल,अ‍ॅथलेस्टिक, कॅरम, या खेळाचा प्रचार व प्रसार केला असून आजपर्यंत 22 राष्ट्रीय खेळाडू तयार केलेे आहेत. रायगड जिल्हाचे कबड्डी पंच म्हणून प्रतिनिधित्व करताना त्यांनी महाराष्ट, तामिळनाडू, बिहार, पाटणा,पतियाळा,पंजाब या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डी पंच म्हणून उत्‍तम काम केले आहे.
दिपक मोकल यांना त्यांचे कार्यकाळात क्रिडा व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्‍लेखनिय कार्याबद्दल रायगड भुषण, राज्य क्रिडारत्न,राष्ट्रीय क्रिडा रत्न, आदर्श जिल्हा क्रिडा पुरस्कार,राष्ट्रीय खेळ गौरव पुरस्कार,महाराष्ट्र शासन जिल्हा गुणवंत क्रिडा पुरस्कार,ठाणे-मुंबई आगरी पुरस्कार,कुलाबा जीवन गौरव पुरस्कार,प्राईड ऑफ इंडिया अवार्ड, आदिवासी समाज संघटना क्रिडा पुरस्कार रायगड जिल्हा आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
फोटो ओळ-दिपक मोकल यांना संस्थेचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे व मिसेस युनिव्हर्स व मिसेस दुबई ज्योती केदारे यांचे हस्ते स्मृती चिन्ह व शाल,श्रीफळ, पुष्पगूच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *