रेवदंडयातील माय-दे-देउस उत्सव यात्रा उत्साहात
रेवदंडयातील माय-दे-देउस उत्सव यात्रा उत्साहात
खिस्ती बांधव व भगीनीची मोठी उपस्थिती
रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडयातील ऐतिहासीक काळाच्या स्मृती जागविणारा पोतृगिज कालीन माय-दे-देउस यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली, या उत्सवाचे निमित्ताने मुरूड तालुक्यातील कोर्लई व संपुर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या ख्रिस्ती बांधव व भगीनीची मोठी उपस्थिती होती.
रेवदंडा गोळा स्टॉप नजीक कोर्लईच्या ख्रिस्ती बांधव व भगीनीचे श्रध्दास्थान असलेले प्राचीन माय-दे-देउस मंदिर आहे. या मंदिरात प्रतिवर्षी फक्त 5 मे या दिवशीच मोठी उत्सव यात्रा संपन्न झाली. कोर्लई येथील ख्रिस्ती बांधव व भगीनीसह मोठया संख्येने विखुरलेले ख्रिस्ती बांधव व भगीनी यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहाने माय-दे-देउस मंदिरात श्रध्दा व भाविकतेने उत्सव साजरा करण्यात आला. गेले महिनाभर पारंपारीक पध्दतीने कोर्लई येथून रेवदंडा माय-दे-देउस मंदिरात चालत येउन मोठया भक्तीने पुजाअर्चा ख्रिस्ती बांधव व भगिनींने केली.
माय-दे-देउस उत्सवाचे दिवशी मंदिरात पुजाअर्चा, प्रार्थना व आरतीचा कार्यक्रम सकाळी 9 वाजण्याचे सुमारास संपन्न झाला, त्यानंतर रितीरीवाजाप्रमाणे माय-दे-देउस मातेची पालखी रेवदंडा बाजारपेठेतून काढण्यात आली. रेवदंडा बाजारपेठेत असंख्य ख्रिस्ती बांधव व भगीनीसह माय-दे-देउस मातेची शिस्तंबध्द पालखी सोहळा पहाण्यासारखा असतो. रेवदंडा बाजारपेठेतून थेट विठोबा आळी मार्गे पुनस्यः मातेच्या मंदिराकडे पालखी सोहळा प्रस्थान करतो.
त्यानंतर माय-दे-देउस मंदिर प्रांगणात ख्रिस्ती बांधव कोर्लई चर्च फादर यांचे मार्गदर्शनाखाली सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विविध स्तुत्य उपक्रमासह मान्यवर ख्रिस्ती बांधवाचा सत्कार करण्यात आला. या उत्सवाचे निमित्ताने माय-दे-देउस मंदिरात उत्कृष्ट सुशोभिकरण करण्यात आले होते. मोठया धार्मिकतेने ख्रिस्ती बांधव व भगीनीने असंख्य उपस्थितीत माय-दे-देउस उत्सव यात्रा उत्साहाने साजरी केली.