ताज्याघडामोडी

रेवदंडा ग्रामपंचायत अधिकारीपदी नितेश तेलंगे यांची नव्याने नियुक्‍ती

रेवदंडा ग्रामपंचायत अधिकारीपदी नितेश तेलंगे यांची नव्याने नियुक्‍ती
रेवदंडा-महेंद्र खैरे-अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठीत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या रेवदंडा ग्रामपंचायत अधिकारीपदी नितेश तेलंगे यांची नव्याने नियुक्‍ती झाली आहे.
विविध ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यभार क्रियाशीलतेने व प्रामाणीकपणे काम करण्याची ख्याती नितेश तेलंगे यांनी मिळविली असून अलिबाग तालुक्यात उत्कृष्ट ग्राम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय अलिबाग तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी ते सध्या कार्यरत आहेत.
फणसापुर येथील मुळ रहिवाशी तसेच माजी जि.प.सदस्य बाळाशेठ तेलंगे यांचे कनिष्ठ पुत्र म्हणून नितेश तेलंगे यांची सर्वपरिचीत ओळख असून रेवदंडा ग्रामपंचायत विभागाची परिपुर्ण माहिती असल्याने रेवदंडा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून चांगल्या कामाची अपेक्षा सर्व स्तरातून केली जात आहे.
मागील ग्रामपंचायत अधिकारी समीर म्हात्रे यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर नव्याने नियुक्‍ती झालेले ग्रामपंचायत अधिकारी नितेश तेलंगे यांचेवर जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा केली जात आहे. रेवदंडा ग्रामपंचायतीचे वतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्या तसेच ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग यांनी त्यांचे पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *