ताज्याघडामोडी

चौल मध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेस मोठा प्रतिसाद

चौल मध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेस मोठा प्रतिसाद
मोरया कला अकादमीचा स्तुत्य उपक्रम

रेवदंडा-महेंद्र खैरे- दिवंगत जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या स्मरणार्थ एकपात्री अभिनव स्पर्धेचा खुला स्पर्धात्मक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेस कलाकार व रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
चौल भाटगल्‍ली येथील प्रकाश कवळे यांचे निवासस्थानी,मोरया कला अकादमीत गुरूवार दि. 1 मे 2025 रोजी ठिक दुपारी 4.00 वाजता एकपात्री अभिनय स्पर्धेचा शुभारंभ मृगज बिजुरकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी कला दिग्दर्शक विनायक काटकर, परिक्षक जेष्ठ रंगकर्मी सुनिल शानबाग सार्थक चासकर, निलेश खोत, आयोजक प्रकाश कवळे, सुधाकर मेस्त्री व नाटय रसिक प्रेक्षक यांची उपस्थिती होती.
या एकपात्री अभिनय स्पर्धा एकंदर तिन गु्रप मध्ये घेण्यात आली, यामध्ये छोटा गटात आठ स्पर्धक मधला गटात आठ स्पर्धक, व खुल्या गटात 15 स्पर्धक असे एकूण 31 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत परिक्षक म्हणून सुनिल शानबाग व सार्थक चासकर यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचे प्रास्ताविक अनिल म्हात्रे व निवेदन गायत्री तुळपुळे यांनी केले. स्पर्धेत गट क्रमांक 1- सात वर्षा पर्यंत, वेळ 2 ते 4 मिनिटे प्रथम क्रमांक दुर्वा सुशांत झावरे, व्दितीय क्रमांक अर्थव शिंदे, गट क्रमांक 2-8 ते 14 वर्षे मध्ये वेळ 3 ते 5 मिनिटे प्रथम क्रमांक तपस्या पाटील, व्दितीय क्रमांक आराध्य पाटील, तृतीय क्रमांक अनन्या गणेश परभाळे, उत्‍तेजनार्थ नव्या वर्तक, तसेच गट क्रमांक 3 मोठा गट 15 वर्षापुढील प्रथम क्रमांक यश कांरडे, व्दितीय क्रमांक श्रुती शिवाजी नाईक, तृतीय क्रमांक अभिषेक पाटील यांनी सुयश मिळविले.
स्पर्धेतील छोटा गटात प्रथम क्रमांकास रूपये एक हजार रोख व सन्मान चिन्ह, व्दितीय क्रमांकास रूपये पाचशे रोख व सन्मान चिन्ह तसेच मधला व मोठा गटास प्रथम क्रमांकास रूपये दोन हजार रोख व सन्मान चिन्ह, व्दितीय क्रमांकास रूपये पंधराशे रोख व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रूपये एक हजार रोख व सन्मान चिन्ह अशी पारितोषीके उपस्थित मान्यवर मृगज बिजुरकर कला दिग्दर्शक विनायक काटकर, परिक्षक जेष्ठ रंगकर्मी सुनिल शानबाग सार्थक चासकर, निलेश खोत, आयोजक प्रकाश कवळे, सुधाकर मेस्त्री यांचे हस्ते वितरीत करण्यात आली. स्पर्धेचा शेवटी मोरया कला अ‍ॅकदमीचे प्रकाश कवळे यांनी सर्व कलाकार, परिक्षक, मान्यवर मंडळी व रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्‍त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *