उसर सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे साखळी उपोषण स्थगित
उसर सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे साखळी उपोषण स्थगित
खासदार सुनिल तटकरे यांनी सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समिती व उसर गेल इंडिया लि. शी साधला संवाद
रेवदंडा-महेंद्र खैरे- जिल्हाचे खासदार सुनिल तटकरे यांनी उसर इंडिया लि. व सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समिती यांचेशी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात चर्चासत्र घडवित, सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्या विविध मागण्याची पुर्तता करण्याचे आश्वासनानंतर साखळी उपोषण स्थगित करत असल्याचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी म्हटले. रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्रीकांत किरविले यांनी उसर गेल कंपनी गेट समोर बसलेल्या साखळी आंदोलनकर्ताना नारळ पाणी देउन उपोषणाची सांगता केली.
उसर गेल इंडिया लि. कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकरांना नोकरी व रोजदांरीपासून अदयापी वंचीत ठेवल्याने उसर गेल कंपनीस सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीने कंपनी गेट समोर साखळी उपोषण व काम बंद आंदोलन दि. 23 एप्रिल रोजी पुकारले होते, त्यानंतर कंपनी गेटवर काम बंद आंदोलन तसेच कंपनी अधिकारीवर्गाचे दारात भिक मागो आंदोलन छेदण्याचा इशारा सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे वतीने अध्यक्ष निलेश गायकर यांनी दिला होता. परंतू रायगड उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी, त्यावेळी सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीस गेल इंडिया लि. उसर अधिकारीवर्ग यांचेशी सोमवार दि. 28 एपिल रोजी समन्वय बैठक आयोजीत करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार सोमवार दि. 28 एपिल रोजी सायकांळी चार वाजता खासदार सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी रायगड, पोलिस उपविभागीय अधिकारी, रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज पो.नि. श्रीकांत किरविले याचे उपस्थितीत सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समिती अध्यक्ष व सर्व समिती सदस्य कार्यकर्ते व गेल इंडिया लि. अधिकारीवर्ग, इतर यांचेशी संवाद चर्चा घडवून आणली. या सभेत प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्राचा कायदयाप्रमाणे नोकरी भरती करण्यात येईल, तसेच गेल इंडिया लि. उसर कंपनीत सर्विेस कॉन्ट्रेक्ट मध्ये प्रथम प्रकल्पग्रस्त त्यानंतर प्रकल्पग्रस्त गाव, स्थानिक ग्रामपंचायत त्यानंतर बाहेरील कामगार घेण्यात यावेत, तसेच गेल इंडिया लि. उसर मध्ये एम.06 या वाहनाना संधी मिळावी आदी ठराव संमत करण्यात आले. त्यानंतर उसर गेल इंडिया कंपनी समोर सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समिती साखळी उपोषण रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज पो.नि. श्रीकांत किरविले यांनी नारळ पाणी देवून सांगता केली, अशी माहिती अध्यक्ष निलेश गायकर यांनी दिली.
या आंदोलनास सयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलनास समितीचे अध्यक्ष निलेश गायकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय ठाकूर, कार्याध्यक्ष अनंत शिंदे, जनरल सेक्रेटरी निखिल पाटील, सेके्रटरी आशिष नाईक, संघटक योगेश गुजर, खजिनदार गिरीष पाटील,सहखजिनदार भरत नाईक, सहसंघटक प्रमोद धसाडे तसेच सदस्य उदय पाटील, किसन घरत, वैभव खंडागळे, जगदीश ठाकूर, महेश शिंदे, प्रपेश पवार, सुभाष पाटील, रामदास शिंदे, मंदार नाईक, संदेश शिंदे, मोहन थळे, अरूण खंडागळे, संतोष पवार, रविंद्र शिंदे, प्रशोभ सांदणकर, रामदास धुमाळ, जगदीश खंडागळे यांचा पांठिबा व सहभाग होता.