ताज्याघडामोडी

ताडवाडी येथे उपकेंद्राचा भुमिपुजन सोहळा उत्साहात

जनतेच्या सर्वागिण विकासासाठी कटिबंध्द -आमदार महेंद्र दळवी
ताडवाडी येथे उपकेंद्राचा भुमिपुजन सोहळा उत्साहात

रेवदंडा-महेंद्र खैरे- सरकारचा आमदार म्हणून शासकीय विविध योजना तुमच्या पर्यंत पोहचविण्याचे काम समस्त पदाधिकारांच्या माध्यमातून जनतेच्या सर्वागिण विकासासाठी कटिबंध्द असल्याचे सुतोवाच आमदार महेंद्र दळवी यांनी ताडवाडी येथे उपकेंद्राच्या भुमिपुजन सोहळयांत उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले.
प्राथमिक आरोग्य केंद्र सार्तिडे अंतर्गत ताडगांव व ताडवाडी येथे उपक्रेंदाचा भुमिपुजन सोहळा मोठया उत्साहात सोमवार दि. 28 एप्रिल रोजी सायकांळी सहा वाजता संपन्न झाला. या भुमिपुजन सोहळा कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीसह मु्ररूउ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड, कामगार नेते दिपक रानवडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे, तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, वळके ग्रा.प.सरपंच प्रिया म्हात्रे, तळेखार ग्रा.प.सरपंच विजय घाणेकर, जेष्ठ कार्यकर्ते सि.एम.ठाकूर,युवासेना मुरूड तालुका प्रमुख अमोल लाड, तालुका संघटक चंद्रकांत मोहिते, शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख तृप्ती पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, मुरूड माजी नगराध्यक्ष माई पाटील,बोर्ली ग्रा.प. सरपंच सपना जायपाटील, ज्योती मुंबईकर, मोहन ठाकूर, रमेश गायकर,मुरूड महिला आघाडी प्रमुख निर्मला म्हात्रे, महिला उपतालुका प्रमुख वैशाली रोटकर, संपर्क प्रमुख मंदाताई ठाकूर, सुरेश ठाकूर, मधूशेठ पाटील,छाया पाटील, बोर्ली आरोग्य सेवक राजेेंद्र चुनेकर, जनार्दन भगत, मंगेश भगत, सुधीर सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निमत्रंक वळके ग्रा.प.सरपंच प्रिया म्हात्रे, चंद्रकांत मोहिते हे होते तर सुत्रसंचलन जगदीश चवरकर,देवानंद मोकळ यांनी केले.
कार्यक्रमस्थळी प्रमुख अतिथी आमदार महेंद्र दळवी यांचे आगमन सायकांळी सहा वाजता झाले यावेळी मोठया जल्‍लोषात वाजतगाजत व फटाक्याचे आतषबाजीने आमदार महेंद्र दळवी यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आमदार महेंद्र दळवी व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते शिवप्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करण्यात आली व प्राथमिक आरोग्य केंद्र सार्तिडे अंतर्गत ताडगांव व ताडवाडी येथे उपक्रेंदाचा भुमिपुजनाचा नामफलकांचे अनावरण आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते व आमदार महेंद्र दळवी व उपस्थित शिवसेना माहिला व पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत चंद्रकांत मोहिते यांनी केले शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून केले तर उपस्थित महिला पदाधिकारी यांचे स्वागत वळके ग्रा.प. सरपंच प्रिया म्हात्रे यांनी केले. तर उपस्थित शिवसेना पदाधिकारी, सरपंच यांचे स्वागत सुधीर सावंत, हर्षद म्हात्रे, काशिनाथ म्हात्रे, नरेश म्हात्रे, आदीने पुष्पगूच्छ प्रदान करून केले. यावेळी प्रास्ताविकेत चंद्रकांत मोहिते यांनी क्रिडा मैदानासह आरोग्य केंद्राची नित्यांत गरज असल्याचे सांगितले तर भगिरथ पाटील यांनी आमदाराचा कार्याचा आढावा घेताना वचनाचा पक्‍का व विकास कामाचा एक्‍का असे गौरवोद‍्गार काढले.
तर आमदार महेंद दळवी यांनी प्रांरभीच कार्यक्रमास उशीर झाल्याबद्दल उपस्थितांची दिलगीरी व्यक्‍त करून प्राथमिक आरोग्य केंद्र सार्तिडे अंतर्गत ताडगांव व ताडवाडी येथे उपक्रेंदाचा भुमिपुजन झाले असे जाहीर केले. सरकारचा आमदार म्हणून शासकीय विविध योजना तुमच्या पर्यंत पोहचविण्याचे काम समस्त पदाधिकारांच्या माध्यमातून जनतेच्या सर्वागिण विकासासाठी कटिबंध्द असल्याचे म्हटले. महिलासाठी उपयुक्‍त असे आरोग्य केंद्राचे भुमिपुजन माताभगिनीच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर येथील दोन उपके्रदातील अंतर व स्थानिकाची मागणीनीने सार्तिडे व वळके साठी उपकेंद्राची उभारणी होत असल्याचे सांगितले. शेवटी क्रिडा मैदान व आरोग्य केंद्र यांची विस्तारीत छान पध्दतीने उभारणी केली जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले. या उपकेंद्रासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचे अंतर्गत होत असून यासाठी साडेसहा कोटी निधीची मंजूरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *