ताज्याघडामोडी

वाडगाव ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित

वाडगाव ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग नजीकच्या वाडगाव ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय पंचायत राज दिवस निमित्‍त 24 एप्रिल रोजी जिल्हा परिषद रायगड व पंचायत समिती अलिबाग यांच्या सयुक्‍त विदयमाने वाडगाव ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल राजिप अतिरिक्‍त मुख्यकर्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले, त्यावेळी राजिप उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव,गट विकास अधिकारी दाजी दांडगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पवार यांनी ग्रा.प.उपसरपंच जयेंद्र भगत, ग्रा.प.माजी सरपंच व विदयमान सदस्या सरिता भगत, सोनाली पाटील, व ग्रामपंचायत अधिकारी संंतोष बोर्ले, सुरेश भगत आदीच्या उपस्थितीत वाडगाव ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्काराचा सन्मान स्विकारला.
वाडगाव ग्रामपंचायतीस मिळालेल्या सुयशाचे वाडगाव ग्रामस्थ व हितचिंतक यांनी सरपंच सारिका पवार तसेच ग्रामपंचायतीचे सर्वोसुवा जयेंद्र भगत व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्या यांचे विशेष कौतूक व अभिनंदन सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *