घातक शस्त्रे बाळगणारे परजिल्हातले तिघे जेरबंद
>घातक शस्त्रे बाळगणारे परजिल्हातले तिघे जेरबंद
गंभीर गुन्हाची शक्यता; रेवदंडा पोलिसांची धडक कारवाई
रेवदंडा-महेंद्र खैरे- अंधारामध्ये नंबरप्लेट नसलेली संशयास्पद उभी असलेली अॅल्टो कारची माहिती प्राप्त होताच, रेवदंडा पोलिसांनी धडक कारवाई केली, या कार मध्ये घातक शस्त्रे आढळून आली असून गंभीर गुन्हा घडण्यापुर्वीच रेवदंडा पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. तिघेही आरोपी अहिल्यानगर जिल्हातील आहेत.
रेवदंडा-अलिबाग रस्तावर रेवदंडा प्रफुल्ल बार येथे दि. 22 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता अंधारा मध्ये दोन्ही नंबर प्लेट काढलेल्या स्थितीत उभी असलेली सफेद रंगाची अल्टो कारची गोपनीय माहितीच्या आधारे रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोसई गांगुर्डे आणि पोलिस कर्मचारी यांनी झडती घेतली. या कार मधील तिघांना अहिल्यानगर-पारनेर येथील शिरपुर गावचा संतोष उचाळे, वय 26 वर्षे अहिल्यानगर-पारनेर मधील आलकुटी गावाचा महेश शिंजाड,वय 25 वर्षे, अहिल्यानगर-पारनेर मधील आलकुटी गावाचा राजू जाधव, वय 23 वर्षे त्यांनी तपासात घेतले, यावेळी सफेद रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये एक धारदार पात्याची लोंखडी पात्याची तलवार, तसेच दोन धारदार पात्याच्या लोखंडी कात्या अशी घातक शस्त्रे आणी स्कुड्रायव्हर,सुरी, लोखंडी पाने, असे साहित्य कार मध्ये आढळून आले. दोन्ही नंबर प्लेट जाणीव पुर्वक काढून ठेवून कोणत्यातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याची पुर्व तयारी व उद्देश असल्याचे पोलिसांना कळून आले. पोसई गांगुर्डे आणि पोलिस कर्मचारी यांनी त्या तिंघाना कार व त्यांतील साहित्यासह ताब्यात घेतले. यावेळी 1 लाख 50 हजार अल्टो कार व इतर साहित्य 2250 अंदाजे किमंतीचा माल पोलिसानी जप्त केला.
रेवदंडा पोलिस ठाणे येथे दि. 23 एप्रिल रोजी रात्री सव्वा एक वाजता त्या तिघांना अटक करण्यात आली, व गुरन 43/2025 गुन्हा नुसार नोंद करण्यात येवून त्या तिघांवर शस्त्र अधिनियम 1959 व इतर, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4,25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रेवदंडा पोलिस कर्मचारी शिपाई पंकज पोले यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात दाखल केली असून अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक शिवकुमार नंदगावे हे पोलिस निरिक्षक श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत.