नागाव येथे दिवाळी पहाट संगित मैफिल
रेवदंडा-महेंद्र खैरे- दिपावलीच्या लक्ष्मी पुजनाचे औचित्याने नागाव येथील श्री वंखनाथ मंदिराचे सभागृहात दिवाळी पहाट संगित मैफिल संपन्न झाली.
भाविकाच्य आग्रहास्तव नागाव ग्रा.प.सदस्य सुरेंद्र नागलेकर यांच्या संकल्पनेतून श्री वंखनाथ मंदिर ग्रामस्थ मंडळ यांच्या दिपावलीच्या निमित्ताने सोमवार दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता दिवाळी पहाट संगित मैफिलचे आयोजन करण्यात आले होते. या संगित मैफिल मध्ये रायगड भुषण मुळे येथील गायक निलेश बुवा जंगम, थळ येथील चंद्रकांत बुवा नवगावकर, गोंधळपाडा येथील महेश बुवा पाटील, आग्राव येथील संजय बुवा डबे यांनी सहभाग घेतला तर नागावचे मृदंगमणी महेश ठाकूर, नागावचे तबला वादनकार सुभाष नाईक यांनी त्यांना साथ दिली.
या संगित मैफिल कार्यक्रमास नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदुशेठ मयेकर, नागाव ग्रा.प.सरपंच निखिल मयेकर, नागाव ग्रा.प.सदस्य हर्षदा मयेकर, नागाव ग्रा.प. सदस्य आदेश मोरे, नागावचे जेष्ठ कार्यकर्ते राजुदादा मयेकर, मंदार वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवराचे स्वागत श्री वंखनाथ मंदिर ग्रामस्थांचे वतीने पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले.
यावेळी मोठया संख्येने नागाव ग्रामस्थानी उपस्थित राहून दिवाळी पहाट संगित मैफिलच्या भक्ती गिते, भाव गिते यांच्या प्रसिध्द गायकाच्या सुमधूर आवाजात आस्वाद घेतला, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नागाव ग्रा.प. सदस्य सुरेंद्र नागलेकर व श्री वंखनाथ मंदिर ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.