ताज्याघडामोडी

सयुक्‍त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे साखळी उपोषण सुरू

सयुक्‍त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे साखळी उपोषण सुरू
कंपनी परिसरात पोलिसांचा कडेकोट बदोबस्त तै
उसर गेल इंडिया लि. कंपनीत प्रकल्पग्रस्त नोकरी व रोजदांरीपासून अदयापी वंचीत
रेवदंडा-महेंद्र खैरे-उसर गेल इंडिया लि. कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकरांना नोकरी व रोजदांरीपासून अदयापी वंचीत ठेवल्याने उसर गेल कंपनीस सयुक्‍त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी कंपनी गेट समोर साखळी उपोषण व काम बंद आंदोलनाचा इशारा कंपनी व्यवस्थापनास निवेदनाव्दोर दिला होता. त्यानुसार सकाळी पासून सयुक्‍त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीने साखळी उपोषणास प्रारंभ केला. यावेळी पोलिसांनी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बदोबस्त कंपनी परिसरात तैनात केला आहे.
गेल इंडिया लि. कंपनीने शेतकरांची 475 एकर जमीन अत्यल्प दराने घेतली आहे. मात्र अदयापी प्रकल्पग्रस्त शेतकरांना कायम स्वरूपी नोकरी नाहीच, परंतू कॉन्ट्रॅक्ट बेसीकवर सुध्दा रोजदांरी देण्यापासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना वंचीत ठेवले आहे. मागील आंदोलनात 150 स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचा गेल इंडिया लि. कंपनी व्यवस्थापनाने आश्‍वासन दिले होते. परंतू आश्‍वसनाला केराची टोपली दाखविली असून अदयापी प्रकल्पग्रस्ताला नोकरी व रोजदारी दिली नाही. स्थानिक गेल इंडिया लि. प्रकल्पग्रस्त शेतकरी अदयापी कायम स्वरूपी नोकरी व रोजदांरी पासून वंचीत आहेत. त्यामुळे गेल इंडिया लि. उसर प्रकल्पग्रस्त शेतकरांनी संप्तत भुमिका घेतली असून गेल इंडिया लि. उसर कंपनी गेट समोर साखळी उपोषण प काम बंद आंदोलन तसेच कंपनी अधिकारांच्या घरा समोर कटोरा घेवून भिक मागो आंदोलनाचा इशारा उसर गेल कंपनीस सयुक्‍त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी कंपनी व्यवस्थापनास दिले होते.
मागण्याचा पुर्तर्तेसाठी न केल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ बेरोजगारीने संप्तत प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे गेल इंडिया लि. उसर प्रकल्पग्रस्त व स्थानिक ग्रामस्थ 23 एप्रिल पासून गेल इंडिया लि. उसर गेट समोर साखळी उपोषण आंदोलन छेदणार असा इशारा निवेदनाव्दारे कंपनी व्यवस्थापनास देण्यात आला होता. जर तरीही कंपनी व्यवस्थापनाने दखल घेतली नाही तर 24 एप्रिल रोजी कंपनी अधिकारांच्या घरासमोर कटोरा घेवून भिक मागो आंदोलन छेदणार व त्यानंतर कंपनी गेट समोर काम बंद आंदोलन अनिश्‍चित कालासाठी चालू राहील असा इशारा सुध्दा उसर गेल इंडिया कंपनीस सयुक्‍त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी दिला आहे.
या आंदोलनास सयुक्‍त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलनास समितीचे अध्यक्ष निलेश गायकर, उपाध्यक्ष दत्‍तात्रेय ठाकूर, कार्याध्यक्ष अनंत शिंदे, जनरल सेक्रेटरी निखिल पाटील, सेके्रटरी आशिष नाईक, संघटक योगेश गुजर, खजिनदार गिरीष पाटील,सहखजिनदार भरत नाईक, सहसंघटक प्रमोद धसाडे तसेच सदस्य उदय पाटील, किसन घरत, वैभव खंडागळे, जगदीश ठाकूर, महेश शिंदे, प्रपेश पवार, सुभाष पाटील, रामदास शिंदे, मंदार नाईक, संदेश शिंदे, मोहन थळे, अरूण खंडागळे, संतोष पवार, रविंद्र शिंदे, प्रशोभ सांदणकर, रामदास धुमाळ, जगदीश खंडागळे यांचा पांठिबा व सहभाग आहे.
दरम्यान पोलिस विभागीय अधिकारी विनित चौधरी, रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली गेल इंडिया उसर कंपनी गेट व मुख्यः रस्त्यावर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बदोबस्त ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *