रेवदंडयातील कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात
रेवदंडा-महेंद्र खैरे- श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडा आयोजीत कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत अनेक आखाडाने सहभाग नोंदविला असून रंगतदार कुस्ती स्पर्धा पहाण्यासाठी मोठी गर्दी कुस्ती प्रेमी मंडळीने केली आहे.
प्रतिवर्षी लक्ष्मी पुजनाचे निमित्ताने रेवदंडा हायस्कुलच्या पटागंणात पारंपारीक कुस्ती स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडाचे वतीने करण्यात येते. रेवदंडयातील या कुस्ती स्पर्धेत जिल्हातील नामवंत खेळाडूने यापुर्वी सहभाग नोंदविला असल्याने या पारंपारीक कुस्ती स्पर्धा नावलौकिकास आहे. ही कुस्ती स्पर्धा नारळावर घेण्यात येत असून अनेक आखाडयातील मल्लांनी सहभाग नोंदविला आहे.
या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला, तत्पुर्वी हनुमान प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून व श्रीफळ वाढवून पुजाअर्चा करण्यात आली. यावेळी शेकापक्षाचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष संदिपभाई घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री छत्रपती शिवाजी मंडळ चौल-रेवदंडा अध्यक्ष सुरेश खोत, खजिनदार शरद वरसोलकर, चिटणीस हेमंत गणपत, सदस्य मधुकर फुंडे, महेश ठाकूर, सुभाष शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते, या स्पर्धेचे सुत्रसंचलनाची जबाबदारी राजेंद्र नाईक सर यांचेवर सोपविण्यात आली आहे.
तसेच स्पर्धेत पंचाचे काम वासूदेव पाटील आंदोशी, रविंद्र घासे नवगाव, प्रमोद भगत आवास, सुधाकर पाटील आंदोशी, व वैभव मुकादम बेलोशी हे पहात आहेत. स्पर्धेसाठी खलिल तांडेल यांचे वतीने प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकास चषक बक्षिस ठेवण्यात आली आहेत.