रेवदंडयात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट
रेवदंडयात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
रेवदंडा-महेंद्र खैरे-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
त्याचे आगमन साळाव जेएसडब्लू कंपनीच्या हॅलीपॅडवर दुपारी पावणेदोनचे सुमारास झाले तेथून त्यांनी रेवदंडा येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी प्रस्थान केले. यावेळी त्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी आणि कुंटूबियाची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी, राष्ट्रवादी जिल्हा सचिव आशिष भट, उपजिल्हा प्रमुख शैलेश चव्हाण आदी शिवसेना कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सायकांळी पाच वाजता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथून परतीचा प्रवासास सुरूवात केली. यावेळी रेवदर्ंडा पारनाका येथील र्श्री मारूतीरायाचे दर्शनाचा लाभ घेतला, येथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष भट यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यथोचीत सत्कार केला. त्यानंतर श्री मारूती मंदिराचे प्रांगणात एमएमआरडी अंतर्गत अलिबाग तालुक्यातील चौल व रामराज विभागातील जिल्हा परिषद गणातील 170 कोटी रूपयांच्या कामांचा शुभारंभ उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यामध्ये चौल नाका ते वावे रस्ता, भोनंग फाटा ते तळवळी फाटा रस्ता, वावे नाका ते बेलोशी ते महाजने रस्ता, रेवदंडा येथे दोन भव्य कमान, रेवदंडा अंतर्गत दोन रस्ते, भंडारी समाज सभागृह, विठोबा आळी येथे सामाजीक सभागृह , रेवदंडा मच्छी मार्केट दुरूस्ती आदी कामाचा समावेश आहे.