ताज्याघडामोडी

सी बीच फोर्ट कँम्पींग चषक 2025 चा विजेता श्री गणेश कुदे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 308.39706;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;
सी बीच फोर्ट कँम्पींग चषक 2025 चा विजेता श्री गणेश कुदे
थेरोंडा खंडेरावपाडा विजय मार्तंड आयोजीत रेवदंडयातील टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा

रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडा हरेश्‍वर मैदानात संपन्न झालेल्या टेनिस बाँल मर्यादीत षटकांच्या सी बीच फोर्ट कँम्पींग चषक 2025 स्पर्धेचा विजेता श्री गणेश कुदे संघ ठरला, तर व्दितीय क्रमांक कोर्लई फे्ंरड संघ, तृतीय क्रमांक सर्वे संघ ठरला. या स्पर्धेत मालिकावीर सर्वे संघाचा निखिल धार्वे, उत्कृष्ट गोलदांज कोर्लई संघाचा हिमांशू मिसाळ यांची निवड करण्यात आली.
थेरोंडा खंडेरावपाडा विजय मार्तंड आयोजीत सी बीच फोर्ट कँम्पींग पुरस्कृत टेनिस बाँल मर्यादीत षटकांच्या सी बीच फोर्ट कँम्पींग चषक 2025 स्पर्धा रेवदंडा हरेश्‍वर मैदानात दि. 10,11, 12 मार्च 2025 रोजी पार पडली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये 30 हजार रोख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 15 हजार रोख व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 8 हजार रोख व भव्य चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट गोलदांज चषक ठेवण्यात आले होते.
या स्पर्धेचा भव्य शुभारंभ थेरोंडा खंडेरावपाडा गाव पाटील गोरखनाथ नवरीकर, दत्‍ताराम बलकवडे,जयेश जंगली, श्याम मारकू, राजेद्र भोसले, गोरख मारकू, संतोष सुडकू आदी मान्यवरांचे उपस्थितीत पार पडला, गाव पाटील गोरखनाथ नवरीकर यांचे हस्ते पुजाअर्चा व श्रीफळ वाढवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विजय मार्तंड थेरोंडा क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण 24 संघानी सहभाग नोंदविला, स्पर्धेत पंचाचे काम संतोष सुडकू व राजेंद्र भोसले यांनी पाहिले.
स्पर्धेचा बक्षिस समारंभास प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अँड प्रविण ठाकूर व रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्‍ल मोरे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रथम,व्दितीय,तृतीय व मालिकावीर, उत्कृष्ट गोलदांज यांना पारितोषीक वितरण करण्यात आले. या संपुर्ण स्पर्धेचे सुत्रसंचलन व समालोचन कपिल ठाकूर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *