ताज्याघडामोडी

नागाव मध्ये पोलिस चौकी लवकरच सुरू करणार-पोलिस महानिरिक्षक संजय दराडे

नागाव मध्ये पोलिस चौकी लवकरच सुरू करणार-पोलिस महानिरिक्षक संजय दराडे
नागाव सुरक्षीतता संदर्भात ग्रामस्थ व व्यावसायीक यांचेशी चर्चा सत्र
रेवदंडा-महेंद्र खैरे-स्वच्छ,सुंदर व सुरक्षीत समुद्र किनारा लाभलेले अलिबाग तालुक्यातील नागाव हे पर्यटनस्थळ म्हणनू पर्यटकांच्या पंसतीस उतरले असून तेथील वाढत्या पर्यटनाने सुरक्षीतेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. त्या निमित्‍ताने नागावची सुरक्षितता संदर्भात ग्रामस्थ व व्यावसायीक यांचेशी चर्चा व मार्गदर्शन कोकण परिक्षेत्र कोकण भुवन नवी मुंबई पोलिस महानिरिक्षक संजय दराडे यांनी केले.
नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी नागाव ग्रा.प. सभागृहात दि. 17 फेब्रुवारी रोजी सायकांळी पाच वाजता नागावची सुरक्षीतता याबाबतचे चर्चासत्र कार्यक्रमांचे नियोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोकण परिक्षेत्र कोकण भुवन नवी मुंबई पोलिस महानिरिक्षक संजय दराडे हे उपिस्थित होते तर त्याचे समवेत रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे,व अपर पोलिस अधिक्षक रायगड अभिजीत शिवथरे, व पोलिस निरिक्षक अलिबाग पोलिस ठाणे किशोर साळे यांची उपस्थिती होती.यावेळी नागाव ग्रा.प.माजी सरपंच नंदुशेठ मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व सदस्या यांचेसह मोठया संख्येने नागाव ग्रामस्थ, महिला यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुरूवातीस विशेष अतिथी कोकण परिक्षेत्र कोकण भुवन नवी मुंबई पोलिस महानिरिक्षक संजय दराडे यांचे जोरदार स्वागत नागाव ग्रामपंचायतीचे वतीने सरपंच हर्षदा मयेकर यांनी केले. यावेळी विदयार्थ्याचे लेझीम पथकांने लक्ष्य वेधून घेतले. नागाव ग्रा.प.सभागृहाचे व्यासपिठावर चर्चासत्र व मार्गदर्शक प्रमुख अतिथी पोलिस महानिरिक्षक संजय दराडे यांचे आगमन होताच, सरपंच हर्षदा मयेकर यांनी शाल,श्रीफळ व वृक्ष रोपटे प्रदान करून स्वागत केले त्यानंतर माजी नागाव ग्रा.प.सरपंच नंदुशेठ मयेकर यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे हस्ते शाल,श्रीफळ व वृक्ष रोपटे प्रदान करून स्वागत करण्यात आले. तर नागाव ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याचे वतीने अपर पोलिस अधिक्षक रायगड अभिजीत शिवथर यांचे शाल,श्रीफळ व वृक्ष रोपटे प्रदान करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भोपी गुरूजी यांनी केले. सुरूवातीस प्रास्ताविकेत सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागाव मधील वाढते पर्यटन, व त्यासाठी आवश्यक सुरक्षीतता याविषयी प्रमुख पाहूण्यांना माहिती दिली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक पोलिस महानिरिक्षक संजय दराडे यांना उपस्थित ग्रामस्थांनी नागाव मधील समस्या व सुरक्षीतता विषयी माहिती दिली.
यावेळी नागाव वाढते पर्यटन व त्यासाठी सुरक्षीतता, महिला सुरक्षीतता याविषयी पोलिस महानिरिक्षक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागाव पोलिस चौकी बाबत केलेली मागणी लवकरच पुर्ण केली जाईल व तेथे पुर्ण वेळ पोलिस कर्मचारी सुरक्षीततेच्या दृष्टीने तैनात केला जाईल असे आश्‍वासन दिले. व उपस्थित महिलावर्ग,ग्रामस्थ व व्यावसायीक याचेशी संवाद साधला. शेवटी दराडे फाउडेशनच्या वतीने नागाव ग्रामपंचायत वाचनालयास बुकशेल्फ कपाट भेट देण्याचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *