रेवदंडयातील टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत सागरी गणेश थळ प्रथम
रेवदंडयातील टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत सागरी गणेश थळ प्रथम
माजी सभापती दिलिपशेठ भोईर उर्फ छोटमशेठ यांचे हस्ते बक्षिस वितरण
रेवदंडा-महेंद्र खैरे- उँ साई मित्रमंडळ थेरोंडा आयोजीत टेनिस बॉल मर्यादीत षटकांचे ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत सागरी गणेश थळ संघ प्रथम विजेता ठरला तर व्दितीय क्रमांक युनिटी धोकवडे, तृतीय क्रमांक बापदेव बोर्ली, चतुर्थ क्रमांक रोहा रोठ, तसेच अंतिम सामनावीर रोशन, उत्कृष्ट फलदांज हसनेन कुरेशी, उत्कृष्ट गोलदांज कल्पेश म्हात्रे, तर मालिकावीर करण तोडणकर यांची निवड करण्यात आली.
रेवदंडा हरेश्वर मैदानात दि. 15,16,17 फेब्रुवारी उँ साई मित्रमंडळ थेरोंडा आयोजीत टेनिस बॉल मर्यादीत षटकांचे क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये 30 हजार व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 15 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 7 हजार व भव्य चषक, तसेच चतुर्थ क्रमांकास रूपये 7 हजार व भव्य चषक तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर, तसेच मालिकावीर, उत्कृष्ट गोलदांज, उत्कृष्ट फलदांज यांना बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 32 संघानी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम माजी जि.प. समाज कल्याण सभापती दिलिपशेठ भोईर उर्फ छोटमशेठ यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आयएसपिल स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणारा आर्यन खारकर यांचा विशेष सत्कार ज.प. समाज कल्याण सभापती दिलिपशेठ भोईर उर्फ छोटमशेठ यांचे करण्यात आला. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नमेश बळी, अभिषेक बळी, अजय चौलकर, अतिल कोंडे आदीने विशेष परिश्रम घेतले.