रेवदंडयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार
रेवदंडा-महेंद्र खैरे- जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा निवासस्थानी सदिच्छा भेटीस आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत व सत्कार रेवदंडा पारनाका येथील श्री मारूती मंदिर देवस्थान पंचकमिटीचे वतीने करण्यात आला, यावेळी अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत केले.
रेवदंडा पारनाका येथील श्री मारूती मंदिर नजीकच जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा निवासस्थान आहे, दुपारी एकचे सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले,
त्यानंतर सायकांळी पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानातून परत जाण्यास निघाले, यावेळी रेवदंडा मारूती मंदिर देवस्थान कमिटीचे वतीने आशिष भट, शरद गोंधळी आदीने त्यांना श्री मारूती मंदिर येथे निमंत्रीत केले होते, त्यानुसार मुख्यमंत्री निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे निवासस्थान येथून पायी मंदिरापर्यत चालत आले, यावेळी त्याचे समवेत आम. महेंद्रशेठ दळवी तसेच जिल्हाधिकारी महेंद्र चौलकर हे सुध्दा उपस्थित होते.
रेवदंडा पारनाका येथील श्री मारूतीरायास नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमस्कार केला, त्यानंतर श्री मारूती मंदिर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने श्री आशिष भट, शरद गोंधळी यांनी सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ तसेच स्मृतीचिन्ह प्रदान करून सत्कार केला. यावेळी मंदिराचे पुजारी बाळा गुरव व आठवले यानी सुध्दा शाल,श्रीफळ, पुष्पगूच्छ व स्मृतीचिन्ह प्रदान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी माजी प्रसाद गोंधळी, रवी वाडेकर व मित्रमंडळाचे वतीने व माजी सरपंच सोनाली मोरे, रेवदंडा ग्रा.प.सदस्य संतोष मोरे यांनी सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुष्पगूच्छ प्रदान केले.