श्री गणेशाची प्रतिकृती श्री फळात अवतरली
श्री गणेशाची प्रतिकृती श्री फळात अवतरली
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रेवदंडयातील रवी वाडेकर कुटूंबियांच्या घरी भाविकांची दर्शनाची रांग
रेवदंडा-महेंद्र खैरे- श्री फळ (नारळ) हे मंगलमय व देवासाठी पवित्र समजले जाते, रेवदंडयातील रवी वाडेकर कुंटूबियाच्या घरी नारळांस कोंब फुटून त्यामध्ये श्री गणेशाची प्रतिकृतीचे दर्शन झाले. ऐन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा योग आल्याने अनेक भाविकांनी मोठया श्रध्दा व भक्तीने दर्शनाचा लाभ घेतला.
रेवदंडयातील चणे शेंगदाणे यांचे विक्रीसाठी प्रसिध्द असलेले रवी वाडेकर यांचे निवासस्थानी एका नारळाला कोंब फुटले, या कोंब फुटलेल्या नारळामध्ये हुबेहूब श्री गणेशाची प्रतिकृती दिसून येत होती. नारळाच्या निघालेल्या कोंब ही श्री गणेशाच्या तोंडासारखा आकार दिसून येत होता. सदर दिवशी संकष्टी असल्याने रवी वाडेकर यांच्या कुटूंबियाने या नारळास ताब्यांच्या कळशात ठेवून भाविकतेने पुजाअर्चा केली.
सदर बाब परिसरातील ग्रामस्थांना समजतात, त्यांनी सुध्दा रवी वाडेकर यांचे घरी जाउन या श्री गणेश रूपी श्रीफळाच्या भाविकतेने व श्रध्देने दर्शनाचा लाभ घेतला.