भुमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी पुढील लढा असेल-चित्रलेखा पाटील
भुमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी पुढील लढा असेल-चित्रलेखा पाटील
रेवदंडा-महेंद्र खैरे- आगामी काळात मोठया प्रमाणात कारखानदारीतून डेव्हलमेंट होत असून या डेव्हलमेंट मध्ये स्थाानिक भुमीपुत्राना न्यायासाठी शेकापक्षाचे वतीने पुढील लढयास सज्ज असल्याचे शेकापक्षाच्या जिल्हा महिला आघाडी नेत्या चित्रलेखा पाटील यांनी उद्गार आंबेपुर येथील कार्यक्रमांस काढले.
शेकापक्षाचे माजी विधान परिषद आम. जयंतभाई पाटील यांच्या निधीतून आंबेपुर फाटा नजीक उभारलेल्या नाभिक समाच्या चौल, रेवदंडा, नागाव, आक्षी, आंबेपूर विभागाच्या समाज सभागृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी नुतन सभागृहाचे शुभारंभ प्रसंगी शेकापक्षाच्या जिल्हा महिला आघाडी नेत्या चित्रलेखा पाटीलसह व्दारकानाथ नाईक, नंदुशेठ मयेकर, प्रकाश खडपे, माजी सरपंच प्रकाश खडपे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन रेवदंडा, आंबेपुर विभाग नाभिक समाज तसेच नाभिक समाज संघटक विजय भोसले होते. या प्रसंगी नुतन सभागृहात नाभिक समाजाचे वतीने वास्तुशांती समारंभ व सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते.
आंबेपुर फाटा नजीक उभारलेल्या नुतन नाभिक समाज सभागृह येथे चित्रलेखा पाटील यांचे सकाळी साडेदहा वाजता आगमन झाले, याप्रंसगी नाभिक समाजाचे वतीने फटाक्याची आतषबाजीने व महिलावर्गानी औक्षण करून स्वागत केले, त्यानंतर नुतन नाभिक समाज सभागृहाचे फित कापून तसेच नामफलकाचे अनावरण चित्रलेखा पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नाभिक समाजाचे विश्वस्त मारूती शिंर्के,यशवंत खराडे, कार्याध्यक्ष रविंद्र देवकर, संवाद कमिटी उपाध्यक्ष रघुनाथ विभार, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा प्रमिला पवार, उपाध्यक्षा रश्मी मोरे, रेवदंडा महिला अध्यक्षा वैष्णवी लाड, उपाध्यक्ष पल्लवी मोरे, संघटक विजय भोसले, सेके्रटरी संदेश चव्हाण, खजिनदार सचिन पवार, महेश भोसले, मनोज कदम, हरेश कदम, प्रदिप मोरे, निलेश मोरे,गणेश भोसले,विक्रांत घाडगे, राकेश मोरे, संदेश घाडगे, राज लाड, विजय लाड, विजय मोरे, अनिल आर्यरकर, संतोष गायकवाड,उमेश शिरसागर आदी प्रमुख कार्यकर्त्यासह मोठया संख्येने नाभिक समाज बांधव व नाभिक समाज महिला यांची उपस्थिती होती.
यावेळी नाभिक समाजाचे वतीने स्वागत व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी चित्रलेखा पाटील यांचा सत्कार नाभिक समाज संघटक विजय भोसले यांचे हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व समाजाचे पदाधिकारी व प्रतिष्ठिताचा सत्कार घेण्यात आला. यावेळी प्रारंभी नाभिक समाजाचे विश्वस्त मारूती शिर्के, व्दारकानाथ नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनतर चित्रलेखा पाटील यांनी मार्गदर्शनात नाभिक समाजाचे वतीने समाज सभागृहासाठी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले, व नाभिक समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पाटील नेहमीच समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगितले. आगामी काळात मोठया प्रमाणात कारखानदारीतून डेव्हलमेंट होत असून या डेव्हलमेंट मध्ये स्थाानिक भुमीपुत्राना न्यायासाठी शेकापक्षाचे वतीने पुढील लढयास सज्ज असल्याचे शेकापक्षाच्या जिल्हा महिला आघाडी नेत्या चित्रलेखा पाटील यांनी म्हटले.
नाभिक समाजाचे संघटक विजय भोसले यांनी े नाभिक समाज सभागृहाची वास्तू उभारण्यास अथक परिश्रम घेतले असून नुतन सभागृह उध्दाटन सोहळा त्यांनी सुयोनिजाने समाज बांधव व भगिनी यांचे समवेत पार पाडला.