रेवदंडा हायस्कुलची एस.एस.सी 1974/75 विदयार्थ्याची बँच एकत्रीत
पन्नास वर्षानी विदयार्थ्याचा गेट टू गेदर
रेवदंडा हायस्कुलची एस.एस.सी 1974/75 विदयार्थ्याची बँच एकत्रीत
रेवदंड-महेंद्र खैरे-आयुष्यातील संध्याकाळी…वयाच्या सत्तरीच्या प्रवासात……पन्नास वर्षापुर्वीच्या शालेय सोबत्याची आठवणी जागृत होउन एकत्रीत येण्याचा संकल्प रेवदंडा हायस्कुलच्या एस.एस.सी 1974/75 विदयार्थ्यानी केला व अविस्मरणीय असा गेट टू गेदर साजरा केला.
विशेष म्हणजे या एस.एस.सी 1974/75 मधील अनेक विदयार्थ्यानी आयुष्याच्या गाडाचे ओझे उतरवून नोकरी, व्यवसाय या मधून निवृत्ती स्विकारली आहे. तब्बल पन्नास वर्षानी रेवदंडा हायस्कुलच्या एस.एस.सी 1974/75 विदयार्थ्याची बँच पुनस्यः गेट टू गेट माध्यमातून एकत्रीत येवून विखुरलेल्या सवंगडयाची गळाभेट अवर्णनीय क्षण ठरला.
गेले पन्नास वर्षे ठिकठिकाणी विखुरलेल्या शालेय सवंगडाना एकत्रीत आणण्याचे संकल्प रेवदंडा हायस्कुलच्या एस.एस.सी 1974/75 विदयार्थ्यानी केला. प्रत्येकांला संपर्क करून दि.19 जानेवारी रोजी चौल पाठारे क्षत्रीय समाज सभागृह येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. यासाठी सुरेश घरत-कोटकर,मधुकर फुंडे, सुनिल नाईक,साकिब लांबाते, राजेंद्र जोमराज, शरद नाईक,किशोर घरत, सरोल वरसोलकर, अरूण चायनाखवा, चारूदत्त झेंडेकर, रामन टिवळेकर, रामदास ढोलके,प्रभाकर नाईक, दिलिप घरत,निलिमा मुकादम, चंद्रकांत म्हात्रे आदीने विशेष परिश्रम घेत एकूण 100 विदयार्थ्याना, शालेय सवंगडयाना एकत्रीत आणण्याचे काम केले. या स्नेह मेळाव्याचे निमित्ताने एस.एस.सी 1974/75 मधील विदयार्थ्यी व विदयार्थीनीने प्रथम रेवदंडा स.रा.तेडुंळकर विदयालयास भेट दिली. शालेतील सवंगडयास पन्नास वर्षाच्या आठवणीना उजाला दिला. त्यावेळचे वर्ग,बेंच, फळा, शाळेची घंटा तसेच शिक्षक यांच्यासह विविध शालेय क्षणाच्या आठवणी दाटून आल्या. एक वेगळाच उत्साह वर्गमित्रांच्या पन्नास वर्षाच्या कालावधी नंतर पुनस्यः मिळाला. शाळेच्या आवारात मित्रवर्गानी ऐकमेंकाची गोड गळाभेट घेवून आठवणी म्हणून फोटो काढण्याचा कार्यक्रम केला.
त्यानंतर चौल पाठारे क्षत्रीय समाज सभागृहाकडे एस.एस.सी 1974/75 मधील विदयार्थ्यी व विदयार्थीनीने स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी प्रस्थान केले. या स्नेह मेळावा कार्यक्रमाची सुरूवात ठिक साडेअकरा वाजता झाली, यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून विव्दांस सर व रेवदंडा पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक शिवकुमार नंदगावे यांना आमंत्रीत करण्यात आले होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस.एस.सी 1974/75 बँच च्या विदयार्थीनी रेवदंडा हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापक सध्याचे चेअरमन, माजी रेवदंडा ग्रा.प. सरपंच सरोज वरसोलकर यांनी भुषविले. तर सत्कार मुर्ती अनंत पडते,शरद दर्णे,मोरेश्वर हाडके, रामदास झळके,चारूदास झेेंडेकर,मधुकर फुंडे, अरूण चायनाखवा, साकिब लांबाते, किशोर घरत या मान्यवरांना व्यासपिठावर आमंत्रीत करण्यात आले होते. तत्पुर्वी कार्यक्रमांची सुरूवात अध्यक्षा सरोल वरसोलकर, मधुकर फुंडे, भारती आचार्य आदीच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व राष्ट्रगीताने करण्यात आली. सुरूवातीस एस.एस.सी 1974/75 बॅच मधील दिवगंत विदयार्थ्याना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.सी 1974/75 बॅच चे विदयार्थी सुरेश घरत-कोटकर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरोज वरसोलकर यांचे स्वागत किशोर घरत, प्रमुख पाहूणे पोलिस उपनिरिक्षक शिवकुमार नंदगावे यांचे स्वागत सुरेश घरत-कोटकर, विव्दांस सर यांचे स्वागत मधुकर फुंडे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून केले तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अनंत पडते यांना प्रमुख पाहूणे पोलिस उपनिरिक्षक शिवकुमार नंदगावे यांचे हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शरद दरणे यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरोज वरसोलकर यांचे हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच माजी तहसिलदार मोरेश्वर हाडके यांना साकिब लांबाते, व माजी तहसिलदार रामदास झळके यांना चारूदत्त झेंडेकर यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच माजी पोलिस अधिकारी चारूदत्त झेंडेकर यांना प्रमुख पाहूणे पोलिस उपनिरिक्षक शिवकुमार नंदगावे यांचे हस्ते, अरूण चायनाखवा यांचे हस्ते भारती आचार्य यांना शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच रेवदंडा अर्बन बँकेचे सभासद साकिब लांबाते यांना विव्दांस सर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपिस्थिीत संवगडयाचे आभार किशोर घरत यांनी व्यक्त केले. शेवटी स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
एस.एस.सी 1974/75 मधील विदयार्थ्यी व विदयार्थीनीने स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रम म्हणून रेवदंडा व चौल परिसरात व रेवदंडा हायस्कुलचे विदयार्थी असलेले व सध्या डॉक्टर पेशात सेवा देत असलेले हद्य रोग तज्ञ डॉ. रणजीत गोरेगांवकर, स्त्री रोग तज्ञ डाँ. केदार ओक,डाँ. विलास ढोलके, डाँ. विजय वरसोलकर,डाँ.रणजीत जैन,डाँ. उज्वल जैन यांना विशेष सत्कार विशेष कार्यक्रमाने केला.
या एस.एस.सी 1974/75 मधील विदयार्थ्यी व विदयार्थीनीने स्नेह मेळाव्यासाठी विशेष परिश्रम सुरेश घरत-कोटकर यांनी घेतली, व कार्यक्रमाचे नियोजन र्प्रास्ताविक व सुत्रसंचलन यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सर्व उपस्थित वर्ग मित्रांनी रेवदंडा माजी ग्रा.प.सरपंच, अलिबाग काँग्रेसचे माजी पदाधिकारी तसेच माळी समाज अध्यक्ष सुरेश घरत-कोटकर यांचा यथोचीत सत्कार या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे हस्ते केला.