शिवसेना उबाठा गट उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ पुरस्कृत मुरूड तालुका प्रिमिअर लीग उत्साहात तुळजाभवानी एंटरप्रायजेस कोर्लई संघ प्रथम विजेता
शिवसेना उबाठा गट उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ पुरस्कृत मुरूड तालुका प्रिमिअर लीग उत्साहात
तुळजाभवानी एंटरप्रायजेस कोर्लई संघ प्रथम विजेता
रेवदंडा-महेंद्र खैरे- शिवसेना उबाठा गट उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ पुरस्कृत टेनिस बॉल क्रिकेटची मर्यादीत षटकांची मुरूड प्रिमिअर लीग मांडळा येथील मैदानात उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत तुळजाभवानी एंटरप्रायजेस कोर्लई संघ प्रथम विजेता ठरला, तर व्दितीय क्रमांक जंजिरा पांईट ए, खारआंबोली संघ, तृतीय क्रमांक सुबोध वने कस्ट्रक्शन काजूवाडी या संघाने पटकाविले. स्पर्धेत उत्कृष्ट फलदांज प्रशांत वाघमारे, उत्कृष्ट गोलदांज निलेश किंजले, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मुस्तकिन उलडे, मालिकावीर मयुर पाटील यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेतील मोटर सायकल बक्षिसाचा मानकरी प्रशांत वाघमारे ठरला. मुरूड तालुक्यातील मांडळा येथील मैदानात शिवसेना उबाठा गट उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ पुरस्कृत टेनिस बॉल क्रिकेटची मर्यादीत षटकांची मुरूड प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 24 संघानी सहभाग घेतला होता. गेले चार दिवस लीग व बाद पध्दतीने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये 1 लाख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 50 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 25 हजार व भव्य चषक तसेच अंतिम सामन्यासाठी सामनावीर व मालिकावीर यांचे साठी चषक तसेच अंतिम सामन्यातील सामनावीरास कुलर-रोशन भोईर यांचेवतीने, संपुर्ण स्पर्धेतील मालिकावीर साठी फ्रिज-सलमान दाखवे यांचेवतीने , तसेच उत्कृष्ट फलदांज लेड टि.व्ही., उत्कृष्ट गोलदांज लेड टि.व्ही. दोन्ही बक्षिसे अल्ताफ बनकर, अतिश कमाने, व मोहम्मद शेवंडवाले यांचे वतीने ठेवण्यात आले होते, स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी गॉगल बक्षिसे ठेवण्यात आले होते. सामन्याचे धावते वर्णन व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वेदांत कंटक यांनी केले.
या स्पर्धेचे जमीर दाखवे उर्फ जम्बो, प्रणय शेळके, शांकु सुतार, धनजंजय मुंबईकर, दिपक पाटील, सुमित ठाकूर, शिवतेज पाटील, प्रशांत पाटील, ॠतिक नागोठकर, हर्षद महाडिक, हबीब घय्ये हे नियोजन समिती सदस्य होते. तर स्पर्धेत शिवसेना उबाठा गट उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, माजी जि.प.सदस्या व कोर्लई ग्रा.प.सरपंच राजश्री मिसाळ, तालुका अध्यक्ष नौशाद दळवी, तसेच संदेश पाटील, जावेद गोरमे, किशोर काजारे, तसेच मुरूड शहर शिवसेनेचे भायदे, व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती स्पर्धेत प्रत्येक दिवशी होती. स्पर्धेच्या शेवटी मुरूड तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटचे माजी खेळाडूचा सत्कार प्रशांत मिसाळ यांचे हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचा बक्षिस समारंभ उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ व कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ, जावेद गोरमे, संदेश पाटील आदी मान्यवरांचे हस्ते पार पडला.