महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरेची आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सदिच्छा भेट
महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरेची आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सदिच्छा भेट
रेवदंडा-राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी नुकतीच जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट रेवदंडा येथील निवासस्थानी घेतली.
रेवदंडा येथे जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे निवासस्थानी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे ठिक साडेअकराचे सुमारास पोहचल्या त्याचे समवेत रा.कॉ. जिल्हा सचिव आशिष भट, व किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंटया गायकवाड यांची उपस्थिती होती. निवासस्थानी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मंत्री आदितीताई तटकरे यांचे स्वागत केले, यावेळी निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांची सुध्दा उपस्थिती होती.
महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुष्पगुच्छ प्रदान केले व त्यांचे शुभ आशिर्वाद घेतले. त्यानंतर मंत्री आदितीताई तटकरे यांनी खुप वेळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे समवेत घालविला. रेवदंडा येथून प्रस्थान करण्यापुर्वी मंत्री आदितीताई तटकरे यांनी रेवदंडा पारनाका येथील श्री मारूतीरायाचे दर्शनाचा लाभ घेतला.