ताज्याघडामोडी

अलिबाग तालुक्यात मेंढपालाची भटकंती सुरू

अलिबाग तालुक्यात मेंढपालाची भटकंती सुरू
रेवदंडा-महेेंद्र खैरे- पश्‍चिम महाराष्ट्रातील मेंढपाल चारा-पाण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. पुुढील सहामहिने कोकणात मुक्‍काम करून पुन्हा आलेल्या मार्गी आपल्या मुळ गावी प्रस्थान करतात. सध्या येथील माळरानावर आपले बिर्‍हाड घेवून भटकंती करताना मेढपाल दिसून येत आहेत. तर शेतकरांकडून त्यांना काही पैसे देवून शेंळया व मेंढयाना शेतात बसविल्या जात आहेत. मेंढयाची लोकर विकून हातामध्ये चांगले पैसे येत असल्याने सांगण्यात येत आहे.
पुणे-सातार्‍यातील काही दुष्काळग्रस्त भागातून अनेक मेंढपाल नोव्हेंबरच्या सुमारास, दिवाळी भाउबीज सणानंतर रायगड जिल्हांत दाखल होतात. यंदाही अलिबाग तालुक्यातील बेलकडे ते वावे पट्टातील गावामधील मोकळया रानमाळावर मोठया प्रमाणात मेढपाल दाखल झाले आहेत. त्यांच्या शेळया मेंढयाना येथील माळरानावर मुबलब असा चारा-पाणी मिळत आहे. घाटमाथ्यावरील दुष्काळी भागात पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही. त्यामुळे कुटूंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी या मेंढपालाना कोकणात यावे लागते असे येथे सातारा जिल्हातील खंडाला तालुक्यातील लोणंद गावचे मेंढपाल दत्‍ता शंकर भायगुडे यांनी म्हटले. मेंढपालाचा जोड व्यवसाय फायदेशीर असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. अलिबाग तालुक्यातील या गावात दहा ते बारा मेंढपाल आले असून अक्षय तृतीये नंतर परतीच्या प्रवासात ते पुन्हा एकत्रीत येतात.
एक मेंढी सरासरी चार ते पाच हजारात खाजगी बाजारात विकली जाते. शिवाय दिडशे ते दोनशे मेंढा बाळगताना 25 ते 30 किलो लोकर विक्री होत असल्याने सांगितले जाते. शिवाय शेतकरांच्या शेतात मेंढया रात्रभर बसविल्यास खर्ची म्हणून मेंढपालास रूपये 125 अथवा चार ते पाच पायली तांदुळ दिले जाते. मेंढयाना रात्रीचे विशेष कवच म्हणून रात्रीचे सरक्षंण कवच म्हणून दिमतीला चार ते पाच तगडी कुत्रीही मेढपालांकडून पाळली जातात. एका गावातून दुसर्‍या गावात संसार वाहून नेण्यासाठी घोडेही उपयोगी ठरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *