अजाणतेचा फायदा घेतला, अल्पवयीन मुलगी गर्भवती
अजाणतेचा फायदा घेतला, अल्पवयीन मुलगी गर्भवती
-अज्ञाताचे विरोधात गुन्हा दाखल
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीत कोर्लई येथे अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषणाची घटना उघडकीस आल्यानंतर काही दिवसांत अजाणतेचा फायदा उठवून अल्पवयीन मुलगी गरोदार राहिल्याची तक्रार रेवदंडा पोलिस ठाणे येथे नोंदविण्यात आली असून अज्ञाताचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीत दिनांक 16/09/2024 रोजी 00.00 च्या सुमारास पिडीत मुलगी अल्पवयीन व अविवाहीत आहे हे माहित असून देखील तिच्या अजाणतेचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्याशी शरिर संबध ठेवल्याने ती गर्भवती राहिली आहे. याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे गु.र.न. 3/2025 ने बाल लैगिक अल्पवयीन सरक्षंण अधिनियम (पास्को), 2012 चे कलम 3,4 भारतीय न्यायसहिता 2023,64,(1) ,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोसई श्रीराम रायभान पडवळ हे करत आहेत.