रेवदंडा येथे रक्तदान महायज्ञ शिबीरास मोठा प्रतिसाद
रेवदंडा येथे रक्तदान महायज्ञ शिबीरास मोठा प्रतिसाद
रेवदंडा-महेंद्र खैरे-सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे वतीने संपुर्ण महाराष्ट्रात 4 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान रक्तदान महायज्ञ शिबीराचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानिमित्त चौल नरेंद्राचार्य सेवाकेंद्राच्या वतीने रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले, या रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद लाभला, यावेळी एकूण 155 रक्तदात्याने रक्तदान केले.
रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार दि. 5 जानेवारी येथे चौल नरेंद्राचार्य सेवाकेंद्राच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीरास सकाळी 9.00 वाजता शुभारंभ रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्ल मोरे व रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकिय अधिकारी डाँ विकासनी चव्हाण यांचे हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी प्रसाद गोंधळी, संदेश माळी आदी मान्यवरासह चौल सेवाकेंद्राचे सदस्य उपस्थित होते. तर रक्तदान शिबीराचे निमित्ताने संतोष जाधव, भुषझा घरत, रेवदंडा ग्रा.प.सदस्य दुशांत झावरे, रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज श्रीकांत किरविले, निलेश खोत, ग्रा.प.सदस्या आशा कमळनाखवा, आदीने सदिच्छा भेट दिली. यावेळी रक्तदार शिबीराचा कार्यक्रमाचे सुत्रसंलचन संदिप ठाकूर यांनी केले. या रक्तदान शिबीरास रोटरी ब्लॅड बँक पनवेलचे विशेष सहकार्य लाभले, यामध्ये डाँ.ज्ञानेश्वर पाटील, अक्षय बोरसे, कौस्तुभ खैरावकर, रोहीत जत्ती, शुभम शिंदे, अभिषेक कोळी, वैशाली कुंभार, उज्वला कुंभार, श्रीकांत कुंभार, प्रियांका कुंभार आदीने परिश्रम घेत योगदान दिले.
हे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रक्तदान शिबीराचा पि.आर. ओ. पुजा कंटक, तसेच सेवाकेंद्र अध्यक्ष विनायक काटकर, दर्शन पंराजपे,नितेश राउत, श्रध्दा घरत, समिर राउत, सायली पाटील, प्रिया राउत, तेजस शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले त्यांना सेवाकेंद्रातील सर्व गुरूबंधू व गुरू भगिनी यांची मोलाची साथ लाभली. या शिबीरास रक्तदात्याचा मोठा प्रतिसाद लाभला, त्यामुळे रक्तदानाची वेळी सकाळी 9.00 ते 5.00 अशी असताना सुध्दा सायकांळी 7.00 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले.