ताज्याघडामोडी

नागाव-खारगल्‍ली येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा शानदार शुभारंभ

नागाव-खारगल्‍ली येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा शानदार शुभारंभ
भंकपबाजी म्हणून विरोधकांनी खिल्‍ली उडविली ती लाडकी बहिण योजना सहा महिने सुरू
रेवदंडा-महेंद्र खैरे-गेल्या अडीच वर्षात अनेक शासकीय योजना शासनाने राबविल्या आहेत, त्यामध्ये भंकपबाजी म्हणून विरोधकांनी लाकडी बहिण योजनेचे खिल्‍ली उडविली होती, ती लाकडी बहिण योजना गेले सहा महिने सुरू असून या योजनेत लाडकी बहिणीस 1500 रूपयांवरून 2100 रूपये लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना सचिव व पक्ष प्रतोद विधान परिषदेच्या आमदार डाँ.मनिषा कायंदे यांनी नागाव खारगल्‍ली येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय शुभारंभ प्रसंगी केले.ll wp-image-1363″ />कार्यक्रमाचे सुरूवातीस रेवदंडा महिला शहर शिवसेना प्रमुख शलाका राउत यांनी प्रास्ताविक केले तर महिला संघटिका संजिवनी राउत यांनी प्रथम मार्गदर्शन केले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले व मागील विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यानी विशेषतः महिला कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले असल्याचे कौतुकास्पद उद‍्गार काढले. यावेळी प्रमुख अतिथी आमदार मनिषा कोयंदे यांनी गेल्या अडीच वर्षात अनेक शासकीय योजना शासनाने राबविल्या आहेत, त्यामध्ये भंकपबाजी म्हणून विरोधकांनी लाकडी बहिण योजनेचे खिल्‍ली उडविली होती, ती लाकडी बहिण योजना गेले सहा महिने सुरू असून या योजनेत लाडकी बहिणीस 1500 रूपयांवरून 2100 रूपये लाभ मिळणार असल्याचे सांगीतले. तत्पुर्वी त्यांनी यापुर्वीचे अडीच वर्षाचे सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोप करून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेवर टिका केली. तर हा पर्यटकांचा जिल्हा असून दळणवळणाचे मार्ग चांगले झाले असल्याचे सांगितले व शिवसेना लोकांचा पक्ष असून शिवसेना घरात नव्हे तर दारात पोहचते त्याप्रमाणे आमदार महेंद्र दळवी हे येथील मतदार संघात काम करत असल्याचे कौतुकास्पद उद‍्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलनाचे गायकवाड यांनी उकृष्टपणे सादरीकरण केले त्यांचे कौतुक आमदार मनिषा कोयंदे यांनी शेवटी केले. त्यानंतर नागाव खारगल्‍ली येथील नुतन रस्ता कॉक्रिटीकरण शुभारंभ आमदार मनिषा कोयंदे यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *