सामाजीक कार्यकर्ते रायगड भुषण शरद गोंधळी यांच्या स्तुत्य उपक्रमाने दिवाळी फराळ साहित्य वाटप
रेवदंडा-महेंद्र खैरे- सामाजीक कार्यकर्ते रायगड भुषण शरद गोंधळी यांच्या स्तुत्य उपक्रमाने रेवदंडा येथील श्री काळभैरव मंदिराचे प्रांगणात दिवाळी फराळ साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी मोठया संख्येने गरजू व गरीब लोकांनी दिवाळी फराळ साहित्य वाटप कार्यक्रमांचा लाभ घेतला.
प्रतिवर्षा प्रमाणे सामाजीक कार्यकर्ते शरद गोंधळी यांनी दिवाळी फराळ साहित्य वाटप कार्यक्रम राबविला, यावेळी मोठया संख्येने गरीब व गरजू लोकांची उपस्थिती होती. सामाजीक कार्यकर्ते शरद गोंधळी यांचे हस्ते दिवाळी फराळ साहित्य वाटपाचा आरंभ करण्यात आला, यावेळी रेवदंडा ग्रा.प. उपसरपंच मंदाताई बळी, माजी ग्रा.प. सदस्य अशोक नाईक, सुहास घोणे, अर्बन बँक संचालक जनार्दन कोंडे, सुरेंद्र गोंधळी, प्रसाद गोंधळी, औदुबंर गोंधळी, भगवान तांबडकर, तुकाराम चुनेकर, आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू नाईक सर यांनी केले.
सामाजीक कार्यकर्ते शरद गोंधळी यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष दिवाळी फराळ साहित्य वाटप कार्यक्रम घेतला जातो, या मध्ये दिवाळी फराळासाठी आवश्यक असे रवा, मैदा, आदी वस्तूचे वितरण केले जाते, यावर्षी फक्त केसरी कार्ड धारकांनाच दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले, सायकांळी चार वाजता दिवाळी फराळ साहित्याचे वाटप कार्यक्रमांस सुरूवात झाली ते सायकांळी साडेसहा वाजेपर्यंत वाटप कार्यक्रम सुरू होता. रेवदंडा व थेरोंडा विभागातील गरजू व गरिब मोठया संख्येने उपस्थित होते.
सामाजीक कार्यकर्ते शरद गोंधळी प्रतिवर्षी दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करतात, त्यांच्या सामाजीक कार्यानेचे त्यांना रायगड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रेवदंडयातील सामाजीक क्षेत्रातील कार्यसम्राट कार्यकर्ते म्हणून शरद गोंधळी यांच्या नावलौकिक आहे.