ताज्याघडामोडी

वाडगाव येथील कुस्ती पंच व कोच प्रशिक्षण शिबीरास मोठा प्रतिसाद

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 226.17097;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 43;
वाडगाव येथील कुस्ती पंच व कोच प्रशिक्षण शिबीरास मोठा प्रतिसाद
जिल्हा व तालुकास्तरावर कुस्ती स्पर्धा वाढविणे व खेळाडूना मार्गदर्शनावर भर
– कुस्तीगीर संघटना जिल्हा अध्यक्ष जयेंद्र भगत यांचे प्रतिपादन

रेवदंडा-महेंद्र खैरे- वाडगाव येथील कुस्ती पंच व कोच प्रशिक्षण शिबीरास कुस्ती प्रेमी व कुस्ती खेळाडूच्या मोठया उपस्थितीने सुयोग्य प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हा व तालुकास्तरावर कुस्ती स्पर्धा वाढविणे व खेळाडूना मार्गदर्शनावर भर देणे, हे पंच व कोच प्रशिक्षण शिबीराच्या आयोजनाचे उद्दीष्ट असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 224.12923;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 46;

अलिबाग तालुक्यात वाडगाव येथील खासदार सुनिल तटकरे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्र येथे रविवाद दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कुस्ती पंच व कोच प्रशिक्षण शिबीरास सुरूवात झाली. सुरूवातीस स्वागत व सत्कार कार्यक्रम येथील सभागृहात जयेंद्र भगत यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी व्यासपिठावरील प्रमुख अतिथी जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व तालुकास्तरावरील कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष भगवान धुळे, उपाध्यक्ष नंदु म्हात्रे,कार्याध्यक्ष सुभाष घासे, सरचिटणीस मारूती आडकर, खजिनदार गजानन हातमोंडे, सहचिटणीस प्रमोद भगत, सहचिटणीस हिरामण भोईर, तांत्रीक राजाराम कुंभार, सदस्य रविंद्र घासे, माजी अध्यक्ष बळीराम पाटील, सदस्य जयराम गवते, सदस्य विलास पाटील, वाडगाव हनुमान तालीम संघ अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, आदी मान्यवर मंडळीचा स्वागत व सत्कार पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने जिल्हा व तालुकास्तरावरील कुस्तीप्रेमी व खेळाडू यांची उपस्थिती होती. तर या कुस्ती पंच व कोच प्रशिक्षण शिबीरासाठी राष्ट्रीय कुस्ती पंच व रायगड जिल्हा कुस्ती कोच संदिप वांजणे यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रीत करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा कुस्ती केंद्राच्या प्रमुख कुस्ती आखाडयात जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष जयेंद्र भगत यांचे उपस्थितीत मान्यवराचे हस्ते श्रीफळ वाढवून कुस्ती पंच व कोच शिबीराचा प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रीय कुस्ती पंच व रायगड जिल्हा कुस्ती कोच संदिप वांजणे यांनी उपस्थित कुस्ती खेळाडू, होतकरू पंच व कोच तसेच जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी यांना उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *