चौल टेकाळकर आळी अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ
चौल टेकाळकर आळी अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ
रेवदंडा-महेंद्र खैरे-चौल ग्रामपंचायत अंतर्गत टेकाळकर आळी अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
चौल टेकाळकर आळी येथे खासदार सुनिल तटकरे यांचे फंडनिधीतून नुतन कॉक्रिटीकरण रस्ता करण्यात येत आहे. या रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ कार्यक्रम अलिबाग तालुक्याचे व चौलचे रहिवाशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रविण राउत यांचे हस्ते प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, चंपावती पतसंस्थेचे चेअरमन विश्वास जोशी, संकेत जोशी,तसेच जयवंत नागवेकर, मोहन पराड,महेश कवळे, साहील कंटक यांच्या प्रमुख उपस्थितीसह टेकाळकर आळी ग्रामस्थ जगदीश म्हात्रे,रोहन कनगुटकर, नितिन टेकाळकर, सचिन टेकाळकर, शैलेश टेकाळकर, नरेंद्र टेकाळकर,विवेक टेकाळकर, शशिकांत टेकाळकर,महेंद्र म्हात्रे,अरूण टेकाळकर, विजय टेकाळकर, नंदकुमार गजानन टेकाळकर, नंदकुमार रघुनाथ टेकाळकर,वंसत टेकाळकर, व सुजल टेकाळकर आदीची उपस्थिती होती.
यावेळी रा.काँ.चे जेष्ठ नेते प्रविण राउत यांचे शुभहस्ते पुजाअर्चा तसेच श्रीफळ वाढवून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.