रेवदंडयात श्री काळभैरव उत्सव उत्साहात
/>रेवदंडयात श्री काळभैरव उत्सव उत्साहात
रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडयातील भाविकांचे श्रध्दास्थान व भक्तीस्थान असलेल्या श्री काळभैरवाचा उत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. रेवदंडा गोळा स्टॉप नजीक हरेश्वर मंदिराशेजारी असलेले श्री काळभैरव मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आहे.
सालाबाद प्रमाणे रेवदंडा गोळा स्टॉप हरेश्वर मंदिर येथे श्री काळभैरव उत्सव शनिवार दि. 23 नोव्हेबर रोजी संपन्न झाला. रेवदंडा श्री काळभैरव मित्रमंडळ व ारेवदंडा योगेश्वरी महिला मंडळ यांचे विदयमाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवास रेवदंडा व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी करून श्री काळभैरव दर्शनाचा लाभ घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच या प्रसंगी रांगोळी प्रदर्शन व रात्री मनोरंजनार्थ मैफिल सप्तसुरांची या संगित रजनीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री काळभैरव उत्सवाचे निमित्ताने मंदिरा सभोवताली आकर्षक विदयुत रोषनाई करण्यात आली होती तसेच या निमित्ताने बनविण्यात आलेला मातीचा किल्ला पहाण्यास सर्वाचे आकर्षण ठरले. हा उत्सव यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी काळभैरव मित्रमंडळ अध्यक्ष वैभव चुनेकर, उपाध्यक्ष भगवान तांबडकर, सेक्रेटरी किरण चुनेकर, सहसेके्रटरी वैभव नाईक, खजिनदार सुरेंद्र गोंधळी, सदस्य अंजनीकुमार तांबडकर, सदस्य राजेश चुनेकर, सदस्य अमित नाईक, सदस्य मिलिंद चुनेकर, सल्लागार शरद गोंधळी, सल्लागार तुकाराम चुनेकर, सल्लागार यशवंत पिटनाईक आदीसह योगेश्वरी महिला मंडळ तसेच युवा व युवती वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.