ताज्याघडामोडी

रेवदंडा मधळा कोळीवाडा ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 157.9566;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature:रेवदंडा मधळा कोळीवाडा ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
आमदार महेंद्र दळवी यांनी केले स्वागत
रेवदंडा-महेंद्र खैरे- गेली अनेक वर्षे रेवदंडा शेकापक्षाचा बालेकिल्‍ला असलेल्या मधळा कोळीवाडा ग्रामस्थ व महिलांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. मधळा कोळीवाडा ग्रामस्थ व महिलाच्या पक्ष प्रवेशाने रेवदंडा शहर शेकापक्षास जोरदार धक्‍का असल्याचे म्हटले जाते.
मधला कोळीवाडा मतदारांमुळे रेवदंडा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक सहा मध्ये शेकापक्षास बळकटी मिळत असे, ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुका मधून शेकापक्षास येथून चांगले एकगठ्ठा मतदान मिळत असे. मात्र आमदार महेंद्र दळवी यांचे कार्यप्रणाली व विकास कामांचा धडाका यांनी प्रेरीत होवून रेवदंडा मोठा कोळीवाडा ग्रामस्थ व महिलांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
रेवदंडा मधळा कोळीवाडा येथील विघ्नहर्ता मंदिराचे प्रांगणात पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार महेंंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थितीसह भाजप जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते, रा.कॉ. जिल्हा सचिव आशिष भट, रेवदंडा सरपंच प्रफुल्‍ल मोरे, भाजपच माणिक बळी, सहकार संस्था जिल्हा संघटक दिलिप पटेल, नारायण गोसावी, तसेच रेवदंडा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. आमदार महेंद्र दळवी यांनी मधळा कोळीवाडा ग्रामस्थ व महिलांचे स्वागत शिवसेना पक्षामध्ये केले. तत्पुर्वी आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत व सत्कार शिवसेना पक्षात मधळा कोळीवाडा ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले.
यावेळी रेवदंडयाचा सर्वागिण विकास महत्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले, व सरपंच प्रफुल्‍ल मोरे यांनी पुर्ण सहकार्य व पांठिबा असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी अँड महेश मोहिते यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. 43;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *