तुलाडदेवी व भाटगल्ली ग्रामस्थ व महिलांचा आमदार महेंद्र दळवी यांना पांठिबा
तुलाडदेवी व भाटगल्ली ग्रामस्थ व महिलांचा आमदार महेंद्र दळवी यांना पांठिबा
रेवदंडा-महेंद्र खैरे- तुलाडदेवी धावीर गल्ली व भाटगल्ली ग्रामस्थ व महिलांनी ऐन विधानसभा निवडणुकपुर्व महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांना पांठिबा जाहीर केला. यावेळी धावीर मंदिरानजीक नवीन इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर बसविण्याचा कामाचे भुमिपुजन जि.प. माजी सदस्या मानसीताई दळवी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
चौल तुलाडदेवी येथील धावीर मंदिर परिसरातील तुलाडदेवी व भाटगल्ली येथील शेतकरीवर्गांचा विदयुत कमी दाबाने पाणीपुरवठा फारच कमी प्रमाणात होत असे. याबाबत येथील शेतकरी बंधूनी कल्पेश नाईक व अमित राउत यांच्या प्रयत्नाने नवीन इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर बसविण्यात येत आहे. त्या कामाचे भुमिपुजन जि.प. माजी सदस्या मानसीताई दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तत्पुर्वी जि.प. माजी सदस्या मानसीताई दळवी यांनी येथील धावीर मंदिरात देवदर्शन घेतले. यावेळी तुलाडदेवी धावीर गल्ली व भाटगल्ली ग्रामस्थ व महिला यांची मोठया संखेने उपस्थिती होती.
यावेळी रा.कॉ.चे पदाधिकारी प्रविण राउत, माजी पं.स.सदस्या प्रतिक्षा राउत यांचेसह कल्पेश नाईक, अमित राउत, तुलाडदेवी शाखा प्रमुख प्राजक्ता नितिन राउत, उपशाखा प्रमुख शितल अमित राउत, चौल शाखाप्रमुख ज्योती शैलेश मुंबईेकर , तसेच अशोक गुरव, हर्षल घरत, शुभम राउत, नितिन राउत, सुभाष राउत, सिध्देश शेणवईकर, निखिल राउत, आदीची उपस्थिती होती.
यावेळी तुलाडदेवी धावीर गल्ली व भाटगल्ली ग्रामस्थ व महिला यांनी अलिबाग मुरूड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांना जाहीर पांठिबा व्यक्त केला. तर माजी. जि.प.सदस्या मानसीताई यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीने दाखविलेल्या अनावस्थेबाबत तिव्र नापंसती व्यक्त केली.