ताज्याघडामोडी

चौल शितळादेवी ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 256.84274;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;
] चौल शितळादेवी ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
चौल विकास कामासाठी दत्‍तक घेणार -आमदार महेंद्र दळवी
रेवदंडा-महेंद्र खैरे-चौल शितळादेवी ग्रामस्थांनी आमदार महेंद्र दळवी यांचे कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवीत नुकताच शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
चौल शितळादेवी मंदिराचे प्रांगणातील रंगमंचावर आमदार महेंद्र दळवी यांचे उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी महायुतीचे आमदार महेंद्र दळवी यांचेसह भाजप जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, रा.कॉ.जिल्हा सचिव आशिष भट, रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्‍ल मोरे, सहकार भारती संघटन रायगड जिल्हा प्रमुख दिलिप पटेल, सुमित्र पतसंस्थेचे अध्यक्ष व रा.काँ.पदाधिकारी प्रविण राउत, चंपावती पंतसंस्थेचे अध्यक्ष विश्‍वास जोशी, भाजप कार्यकर्ते संकेत जोशी, शिवसेनेचे प्रशांत शेणवईकर, रेवदंडा ग्रा.प.सदस्य दुशांत झावरे,हर्षल घरत, प्रसाद गोंधळी, कल्पेश नाईक, चौल ग्रा.प.माजी सरपंच प्रतिक्षा राउत, रेवदंडा महिला शाखाप्रमुख शलाका राउत, आग्राव महिला शाखा प्रमुख ज्योती शैलेश मुंबईकर, तसेच चौल मधील शिवसेना, रा.काँ. पक्षाचे महिला कार्यकर्त्या व चौल ग्रामस्थ व महिला यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवसेना चौल शाखा प्रमुख महेंद्र घरत यांनी केले.
चौल शितळादेवी ग्रामस्थ विकास पाटील, नारायण घरत,चंद्रकांत वर्तत, प्रभाकर वर्तक, प्रशांत नाईक,बाळाराम वर्तक, चंद्रकांत कुरूळकर, मिलिंद नाईक, संतोष नाईक,अमित नाईक,मंदार वर्तक, मयुर वर्तक, दिपक वर्तक, वैभव नाईक,सुधाकर गुरव आदीने या पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना चौलच्या ऐतिहासिक गाव असून सर्वागिण विकासासाठी वंचीत आहे, चौलच्या विकासासाठी यापुढे निश्‍चित प्राधान्य देईन व चौल विकासासाठी दत्‍तक घेणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले. यावेळी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार्‍या सर्व कार्यकर्त्याचा भ्रमनिरस होणार नाही यांची ग्वाही त्यांनी दिली. तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या विजय निश्‍चित असल्याचे सांगून भविष्यात चौल ग्रामपंचायतीत शिवसेना व भाजप व रा.कॉ. प्रणित युतीची सत्‍ता येईल असे सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *