ताज्याघडामोडी

रेवदंडयातून महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रचाराचा श्री गणेशा

रेवदंडयातून महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रचाराचा श्री गणेशा
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडयाचे आराध्य दैवत श्री मारूतीरायाचे चरणी श्रीफळ वाढवून महायुतीचे अलिबाग-मुरूड विधानसभा 192 चे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्री गणेशा केला.
अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघात येत असलेले रेवदंडा हे ठिकाण निरूपणकार कै. नानासाहेब धर्माधिकारी व जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे पुण्य कर्मभुमी म्हण्ाून महाराष्ट्रासह संपुर्ण देशात ओळख ठेवून आहे. जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे निवासस्थान नजीक असलेल्या पारनाका येथील रेवदंडा शहराचे आराध्य दैवत श्री मारूतीरायाचे चरणी श्रीफळ वाढवून आमदार महेंद्र दळवी यांनी श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा केला.
सकाळी साडे दहाचे सुमारास आमदार महेंद्र दळवी यांचे आगमन रेवदंडा येथे झाले, यावेळी त्याचे समवेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते, व शिवसेना तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांची उपस्थिती होती. प्रारंभी आमदार महेंद्र दळवी यांनी मारूतीरायांचे दर्शन घेतले तद्नंतर मंदिराचे समोरील प्रांगणात प्रचाराचा श्रीफळ वाढविण्याचा कार्यक्रम झाला.
यावेळी महायुतीचे आमदार महेंद्र दळवी यांनी श्रीफळ वाढवून अलिबाग-मुरूड विधानसभा 192 चे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्री गणेशा केला. यावेळी रा.कॉ. जिल्हा सचिव आशिष भट, रेवदंडा सरपंच प्रफुल्‍ल मोरे, सामाजीक कार्यकर्ते शरद गोंधळी, उपसरपंच मंदाताई बळी, माणिक बळी, भाजपचे दिलिप पटेल, विश्‍वास जोशी, संकेत जोशी,प्रकाश दांडेकर, तसेच ग्रा.प. सदस्या मानकर, ग्रा.प.सदस्य दुशांत झावरे, ग्रा.प.सदस्य सुराराम माळी, प्रविण राउत, प्रविण घरत, जिल्हा युवा सेना पदाधिकारी हर्षल घरत,सलिम तांडेल, रूही तांडेल,महिला शिवसेना उपतालुका प्रमुख विनोदीनी कोंडे, विभाग प्रमुख संतोष कोंडे, शाखा प्रमुख सुरेल कोंडे, शाखा प्रमुख धनजंय कोंडे, भारती मोरे, ताराचंद कोंडे, रेवदंडा शहर महिला अध्यक्षा शलाका राउत, रेवदंडा शहर अध्यक्ष योगेश पिटनाईक, केदार खोत, विजय हाडकर, समीर आठवले, विवेक दांडेकर, चंद्रकांत दांडेकर, मंगेश वडके, प्रमोद म्हात्रे, प्रसाद गोंधळी, विधानसभा महिला उपसंघटके तनुजा घरत, भुषण घरत,ज्योती मुंबईकर, आदी चौल,रेवदंडा व थेरोंडा शिवसेना पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांचे समवेत रा.कॉ.जिल्हा सचिव आशिष भट,भाजप जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते, सरपंच प्रफुल्‍ल मोरे, शरद गोंधळी, संकेत जोशी, मंगेश वडके, आदीने श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *