ताज्याघडामोडी जिंकण्याच्या इर्षेनेच निवडणुकीचा रिंगणात – आमदार महेंद्र दळवी October 27, 2024 Mahendra Khaire आग्राव मध्ये नुतन शिडाची होडी बांधणी मुहूर्त सोहळा उत्साहात जिंकण्याच्या इर्षेनेच निवडणुकीचा रिंगणात – आमदार महेंद्र दळवी रेवदंडा-महेंद्र खैरे- जशी होंडयाच्या शर्यतीची स्पर्धा असते, तशीच स्पर्धा येत्या निवडणुकीत आहे, या स्पर्धेत स्पर्धक नाहीच असेच वाटते मात्र जिंकण्याच्या इर्षेनेच या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे उद्गार आमदार महेंद्र दळवी यांनी आग्राव येथे नुतन शिडाची होडी बांधणी मुहूर्त सोहळा प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले. अलिबाग तालुक्यातील आग्राव येथे शिंडयाच्या होडीच्या स्पर्धेसाठी नुतन शिडाची होंडी बांधणीचा मुहूर्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती तर आदिती दळवी, मुरूड नगरपालिका माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, आग्राव जेष्ठ कार्यकर्ते नारायण मुंबईकर, शिवसेना अलिबाग तालुका अध्यक्ष अनंता गोंधळी, ज्योती मुंबईकर, रा.कॉ.चे चौलचे नेते प्रविण राउत, असिफ किरकिरे, महिला विधानसभा संघटक तनुजा घरत, महेंद्र घरत, संकेत जोशी तसेच मोठया संख्येने आग्राव कोळी बांधव व भगिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन ज्योती मुंबईकर, नारायण मुंबईकर व आग्राव कोळी बांधव ग्रामस्थ व युवावर्ग यांनी केले होते. आग्राव येथे आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागतासाठी कोळी बांधव व भगिनी तसेच युवावर्ग यांची मोठी उपस्थिती होती. त्याचे आगमन होताच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली व महिलांनी औक्षण केले त्यानंतर वाजतगाजत बेजोंपथकाचा तालावर आमदार महेंद्र दळवी यांची मिरवणूक काढण्यात आली. आगा्रव गावात नुतन शिडाची होडी बांधण्यात येत असलेल्या ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत व सत्कार आग्राव ग्रामस्थ व महिला यांचे वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवराचे स्वागत आग्राव ग्रामस्थ व महिला यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून केले. नुतन शिड होडी बांधण्याचा शुभारंभ आमदार महेंद्र दळवी व उपस्थित मान्यवर मंडळी यांचे हस्ते पुजाअर्चा व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र दळवी यांनी जशी होंडयाच्या शर्यतीची स्पर्धा असते, तशीच स्पर्धा येत्या निवडणुकीत आहे, या स्पर्धेत स्पर्धक नाहीच असेच वाटते मात्र जिंकण्याच्या इर्षेनेच या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे उद्गार काढले व येत्या निवडणुकीत जरूरीने मतदार करा, व मोठया फरकांने विजयी करा असे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांना केले. Post Views: 207