चौल बवळे गल्ली ग्रामस्थ व महिलांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
चौल बवळे गल्ली ग्रामस्थ व महिलांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यातील चौल ग्रामपंचायत हद्दीतील तुलाडदेवी नजीकच्या बवळे गल्ली येथील ग्रामस्थ व महिलांनी शिवसेना-शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने चर्चेचा विषय ठरला.
चौल येथे महायुतीच्या प्रचार सभेत शिवसेना-शिंदे गटाचे अलिबाग-मुरूड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांचे कार्यप्रणाली व विकास कामांच्या झंझावाताने प्रेरीत होवून चौल बवळे गल्ली मधील ग्रामस्थ व महिलांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकपुर्व चौल मधील बवळे गल्ली ग्रामस्थ व महिलांच्या शिवसेना पक्ष प्रवेश विशेष महत्वपुर्ण ठरला आहे. चौल बवळे गल्ली ग्रामस्थ व महिलांनी मोठया संख्येने शिवसेना-शिंदे गटात पक्ष प्रवेश केला, त्याचे स्वागत आमदार महेंद ्र दळवी व मुंबईचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी भगवी शाल परिधान करून पुष्पगुच्छाने स्वागत केले.
हा पक्ष प्रवेश कार्यक्रम शिवसेना विधानसभा संघटिका तनुजा भुषण घरत,आग्राव शाखाप्रमुख ज्योती शैलेश मुंबईकर, तुलाडदेवी शाखा प्रमुख प्राजक्ता नितिन राउत, उपशाखा प्रमुख शितल अमित राउत, धडाडीचे कार्यकर्ते अशोक गुरव, निखिल राउत, अमित राउत, शुभम राउत, नितिन राउत,यांचे विशेष परिश्रमाने पार पडला. यावेळी व्यासपिठावर आमदार महेंद्र दळवी यांच्यासह जिल्हा प्रमुख राजा केणी, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, तसेच महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
ृ />