ताज्याघडामोडी

प्रामाणिक काम केले, मतदार माझे सांगाती-आमदार महेंद्र दळवी


प्रामाणिक काम केले, मतदार माझे सांगाती-आमदार महेंद्र दळवी
रेवदंडा-महेंद्र खैरे- प्रामाणिक काम केले, परंतू अनेक पक्षानी माझेशी गद्दारी केली, परंतू लोक माझे सांगातीच राहिली. गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून काम प्रामाणिकपणे काम केले, लोकांची सेवा केली त्याची पोच पावती येत्या निवडणूकीत निश्‍चित मिळेल असे उद‍्गार आमदार महेंद्र दळवी यांनी चौल विभागीय महायुतीच्या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले.
चौल बागमळा येथे श्री शारदा पेट्रोल पंप नजीक सभागृहात चौल विभागीय सभा महायुतीचे आमदार महेंद्र दळवी यांचे प्रचारार्थ नुकतीच संपन्न झाली. यावेळी महायुतीचे शिवसेना उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच मुंबई महानगरपालिकेचे माजी सभापती मंगेश सातमकर,शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी, भाजप तालुका अध्यक्ष उदय काठे, माजी अध्यक्ष हेमंत दांडेकर, भाजप जेष्ठ पदाधिकारी सतिश लेले, शिवसेना जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव आशिष भट, चौल रा.कॉ. नेते प्रविण राउत, जेष्ठ नेत्या जुलेखा तांडेल, माजी जि.प.सदस्य बाळाशेठ तेलंगे, शरद गोंधळी, भाजपचे दिलिप पटेल, चंपावती पतसंस्थेचे चेअरमन विश्‍वास जोशी, जिल्हा महिला संघटिका संजिवनी नाईक, रेवदंडा सरपंच प्रफुल्‍ल मोरे, प्रशांत शेणवईकर, हर्षल घरत, भुषण घरत, संकेत राउत, आदी चौल,रेवदंडा,वरंडे विभागीय शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीसह मोठया संख्येने मतदार बंधूभगिनीची उपस्थिती होती.
प्रांरभी आमदार महेंद्र दळवी व मान्यवर उपस्थित यांचे हस्ते दिपप्रज्वलन, प्रतिमा पुजन करण्यात आले, त्यानंतर चौल व रेवदंडा शिवसेना व भाजप पदाधिकारांचे वतीने आमदार महेंद्र दळवी यांच्या विशेष सत्कार तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या सभेत अल्पसंख्याक आघाडीच्या रूही तांडेल-घोले, महिला आघाडीच्या जितेश्री पाटील,भाजपचे माजी अध्यक्ष हेमंत दांडेकर, माजी जि.प.सदस्य बाळाशेठ तेलंगे, तसेच मुंबईचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र दळवी यांना बहुमताने निवडून दयावे असे आवाहन केले.
आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मागील राजकीय परिस्थितीचे विश्‍लेषण केले व गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या माध्यमातून आमदार म्हणून अलिबाग-मुरूड-रोहा मतदार संघात अनेक विकास कामे राबवित अभुतपुर्व बदल घडविले. तसेच रेवस, रेवदंडा व आगरदांडा पुल बांधकामाचे नवीन विकास कामे मंजूर आहेत. जनतेला पायाभुत सुविधा उपलब्ध करून देताना पर्यटन व रोजगार अश्या महत्वाच्या क्षेत्रात जोमाने कामे केली असून पुढेही होतील असे सांगतानाच महायुतीला गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विकासाचे वारकरी म्हणून अविरत काम करत राहू अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *