विजय कोळी यांचे निधन
विजय कोळी यांचे निधन
रेवदंडा | रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी रेवदंडा-मोठा कोळीवाडा येथील स्थाईक विजय कृष्णा कोळी यांचे नैसर्गिक निधन झाले. त्यांचे अंत्यविधी तथा सर्व उत्तरकार्य ही त्यांच्या रेवदंडा येथील राहत्या घरी करण्यात येतील.
मुंबई येथील जन्म आणि किशोरवयीन अवस्था जगलेले पण शहराच्या धकाधकीच्या आयुष्याला कंटाळलेले विजय कोळी यांनी रेवदंड्याची कन्या शुभांगी रागा यांच्यासोबत प्रेमविवाह केला आणि रेवदंडा येथे कायमचे स्थाईक झाले. इलेक्ट्रिकल, प्लंबिंग यांची कामे करणारे विजय कोळी हे दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस असून, स्थानिक परिसरात त्यांना भावजी याच नावाने ओळखतात. गेले ०६ महिने त्यांची प्रकृती खालावली असून, वैद्यकीय इलाज सुरू होते. मात्र त्यांचे शरीर त्या उपचारांना साथ देत नव्हते.
अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारत शोककळा पसरली असून, त्यांच्या मागे एक मुलगा, पत्नी, आई, दोन भाऊ, बहिणी, भाचे – भाची, पुतणी असा परिवार आहे