रेवदंडयात मोठे मताधिक्य अपेक्षीत-आम. महेंद्र दळवी

रेवदंडयात मोठे मताधिक्य अपेक्षीत-आम. महेंद्र दळवी
रेवदंडा-महेंद्र खैरे- आगामी अलिबाग-मुरूड विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र दळवी हे महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित असल्याने त्यांनी ठिकठिकाणी गाव बैठका व कार्यकर्त्याच्या भेटीगाठीच्या निमित्ताने रेवदंडयातून प्रचारास प्रारंभ केला. यावेळी रेवदंडा पारनाका येथे उपस्थित कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना रेवदंडयात मोठे मताधिक्य अपेक्षीत असल्याचे त्यांनी म्हटले.
अलिबाग विधानसभा निवडणुक प्रचारार्थ गाव बैठक स्वरूपात रेवदंडा पारनाका मारूती मंदिर शेजारी प्रकाश दांडेकर यांचे प्रांगणात आमदार महेंद्र दळवी यांनी आगामी विधानसभा निवडणुक सभा शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सायकांळी सहा वाजता घेतली यावेळी त्यांचे समवेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश चव्हाण व जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे यांची उपस्थिती होती. या गाव बैठकीस महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने आशिष भट, शरद गोंधळी, रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्ल मोरे, दिलिप पटेल, माणिक बळी, ज्ञानेश्वर टिवळेकर, ग्रा.प.सदस्य दुशांत झावरे, प्रकाश दांडेकर, ताराचंद कोंडे, भगिरथ पाटील, ग्रा.प.सदस्य सुराराम माळी, सलिम तांडेल,समिर आठवले, योगेश पिटनाईक, हर्षल घरत,प्र्रसाद गोंधळी,सुरेल कोंडे आदी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तर महिलावर्गात शलाका राउत, भारती मोरे, ज्योती मुंबईकर, रूही तांडेल आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी शरद गोंधळी, आशिष भट, दिलिप पटेल यांचेसह सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांचे पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत केले त्यानंतर भाजप रेवदंडा शहर अध्यक्ष प्रकाश दांडेकर, आशिष भट यांनी आमदार महेद्र दळवी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत सत्कार केला.
आगामी विधानसभा निवडणुकीची रूपरेषा मांडताना आमदार महेंद्र दळवी यांनी लवकरच महायुतीतील एकत्रीत पक्ष नेतृत्वा मध्ये चिंतन बैठक होईल, त्यानुसार अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघाची सर्व पक्षाची एकत्रीत संवाद सभा घेतली जाईल. यावेळी त्यांनी रेवदंडा ग्रामपंचात निवडणुकीचे मताधिक्य व खासदार निवडणुकीचे मताधिक्य पहाता रेवदंडयात मोठे मताधिक्य अपेक्षीत असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले.
