चौल श्री सद्गुरू पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
चौल श्री सद्गुरू पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे-चौल येथील श्री सद्गुरू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली.
चौल श्री सद्गुरू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात रविवार दि. 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी ठिक 3.00 वाजता पतसंस्थेचे विदयमान अध्यक्ष प्रविण राउत यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर म्हात्रे,सेके्रटरी असिफ किरकिरे,खजिनदार प्रतिक्षा प्रविण राउत, संचालक प्रथमेश प्रविण राउत, संचालिका शुभांगी दिपक पाटील,संचालक विश्वनाथ म्हात्रे, संचालिका ज्योती म्हात्रे,संचालिका योगिता नाईक,संचालक प्रविण बाजी, कायदेशीर सल्लागार अॅड. महेश म्हात्रे,व्यवस्थापक महेंद्र म्हात्रे, उपव्यवस्थापक निलेश राउत आदीची उपस्थिती व्यासपिठावर होती. यावेळी मोठया संख्येने श्री सद्गुरू पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते.
या सभेत मागील सभेचे इतिवृत्तात वाचन करून मंजूर करणे, दि. 31/03/2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल वाचून मंजूर करणे,दि. 31/03/2024 रोजीचे तेरील पत्रक, नफा-तोटा पत्रक,व ताळेबंद पत्रक मंजूर करून नफा वाटणीस मंजूरी करणे, शासकिय हिशोब तपासणीसांचा सन 2024-2024 या आर्थिक वर्षाच्या अहवालाची नोंद घेणे व स्विकृत करणे, मागील लगतच्या वर्षाच्या लेखा परिक्षण अहवालाच्या दोष दुरूस्ती अहवाल सादर करणे व त्यास मंजूरी देणे, सन 2024-2025 च्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे, सभासदाना प्रशिक्षण देणे,साई निर्मल गणेश योजनेअंतर्गत गरजूना मदत देणे, सभासदाना भेट वस्तू देणे, गुणवंत विदयार्थ्याचा गुणगौरव,तसेच अध्यक्षाचे परवागीने आयत्या वेळे येणार्या विषयांचा विचार विनिमय करणे, आदी कार्यक्रम घेण्यात आले.
सभेची सुरूवात दिवंगताना श्रध्दाजंली अर्पण करून करण्यात आली, त्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रविण राउत यांनी उपस्थित सभासदाचे स्वागत केले. यावेळी पतसंस्थेच्या वतीने विदयमान अध्यक्ष प्रविण राउत यांचे स्वागत व सत्कार पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. त्यानंतर पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर म्हात्रे, सेक्रेटरी असिफ किरकिरे, खजिनदार प्रतिक्षा राउत तसेच उपस्थित संचालक यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. यावेळी उपस्थित सभासदांना पतसंस्थेचे वतीने भेटवस्तू अध्यक्ष प्रविण राउत यांचे हस्ते देण्यात आल्या. तसेच इयत्ता दहावी व बारावी इयत्तेतील गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार अध्यक्ष प्रविण राउत यांचे हस्ते भेटवस्तू, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. पतसंस्थेच्या वतीने चौल व रेवदंडा मधील सहा गरजू महिलांना रूपये पाच हजार मदतनिधी म्हणून अध्यक्ष प्रविण राउत यांचे हस्ते देण्यात आले.
सभेचे सुत्रसंचलन व अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी आसिफ किरकिरे यांनी केले.