नांदगाव माळी समाज सभागृहात मुरूड तालुका अल्पसंख्याक मेळावा संपन्न

बॅ.अंतुले गुरूस्थानी, त्यांची स्वप्ने साकारणार-आम.महेंद्र दळवी
नांदगाव माळी समाज सभागृहात मुरूड तालुका अल्पसंख्याक मेळावा संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे-मुरूड तालुक्याचा सर्वागिण विकासाचे नियोजन केले असून भविष्यात राज्यासह खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून केंद्राच्या अनेक योजना राबविणार असल्याचे सांगून बँ.अंतुले गुरूस्थानी असल्याचे त्यांची सर्व स्वप्ने पुर्ण करणार असल्याचे प्रतिपादन अलिबाग-मुरूडचे विदयमान आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
नांदगाव माळी समाज सभागृहात मुरूड तालुका अल्पसंख्याक मेळावाचे आयोजन नांदगाव ग्रा.प.माजी सरपंच मुज्जवर हसवारे यांनी दि. 28 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी दोन या दरम्यान केले होते. या मेळाव्यात अल्पसंख्याकाचे समस्या बाबत खुल्या चर्चेचे करण्यात आले होते. या मेळाव्यास अलिबाग-मुरूडचे विदयमान आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रीत करण्यात आले होते. तर मुरूड तालुका अल्पसंख्याक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुरूवातीस प्रास्तविकेत माजी सरपंच मुज्जवर हसवारे यांनी अल्पसंख्याक समाज बांधवाच्या समस्या व प्रश्न या मेळाव्यात आमदार महेंद्र दळवी जाणून घेतील व निश्चित सोडवितील असे सांगीतले, यावेळी सरपंच मुज्जवर हसवारे व उपस्थित समाज बांधव मान्यवराचे हस्ते आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. त्यानंतर सईद पंचुलकर, युसूफ अर्जबेगी, असगर दळवी, दिलावर महाडकर, जुबेर कुटकी, कुतूबुद्दीन उलडे, विजय पाटील, प्यारा किल्लेदार, रिहान कादरी, बादल कबले, मन्सुर अधिकारी, पंचुलकर आदीने विविध प्रश्न मांडून ते सोडविण्याचे आवाहन उपस्थित आमदार महेंद्र दळवी यांना केले. या मेळाव्यास सय्यदअली खान,नुरजहॉ राउत,झिनत हसवारे, साकिब गजबे, समीर दवनाक, आसिफ मदगरी, सकीना बोरी, निसार दखनी, निसार अनवारे, जमील बकवाल, महमंद सईद शिरसकर, फैरोज अनवारे, नजीर मखनाके, दिलावर महाडकर, असगर दळवी, आदी अल्पसंख्याक मान्यवरासह अल्पसंख्याक समाज अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाज बांधव यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थित अल्पसंख्याक बांधवाना मार्गदर्शन करताना म्हटले मुरूड तालुक्याचा सर्वागिण विकासाचे नियोजन केले असून भविष्यात राज्यासह खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून केंद्राच्या अनेक योजना राबविणार असल्याचे सांगून बँ.अंतुले गुरूस्थानी असल्याचे त्यांची सर्व स्वप्ने पुर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी अल्पसंख्याक समाजाचा समस्या व प्रश्न समाजावून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून लोकसभा निवडणूकीत अलिबाग व मुरूड तालुक्याचा मोठा वाटा असून खासदार सुनिल तटकरे यांना मोठे मताधिक्य मिळाल्याचे म्हटले. मात्र लोकसभा निवडणुकीत दरम्यान महायुती पासून अल्पसंख्याक समाज महायुतीपासून दुर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच एमएमआरडी मध्ये रेवदंडा पर्यंत भाग सामाविष्ट करण्यात आला असून मुरूड तालुक्याचा सुध्दा समावेश त्यामध्ये केला जाईल व येत्या पंधरा दिवसांत यांची घोषणा केली जाईल असे त्यांनी जाहीर केले.
या मेळाव्यात आमदार महेंद्र दळवी यांचेसह शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे, तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख अनंत गोंधळी, भाई सुर्वे, अशोक धुमाळ, उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, स्नेहा पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ, विदयाधर चोगले, सुनिल पाटील आदी मान्यवर मंडळीची सुध्दा उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष टेंबे यांनी केले तर आभार सुहेल अनवारे यांनी व्यक्त केले.