वाडगाव येथे वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप –

वाडगाव येथे वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप –
रा.कॉ. तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या स्तुत्य उपक्रम
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे रा.कॉ. अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या स्तुत्य उपक्रमाने वृक्षारोपण व विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम रा.कॉ. राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार यांचे वाढदिवसाचे निमित्ताने संपन्न झाला.
वाडगाव ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम व राजिप प्राथमिक शाळा वाडगाव येथे रविवार दि. 22 जुलै रोजी रा.कॉ. राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार यांचे वाढदिवसाचे निमित्ताने आयोजीत केले होते. प्रसंगी रा.कॉ. तालुका अध्यक्ष तथा वाडगाव ग्रा.प.उपसरपंच जयेंद्र भगत यांचेसह सरपंच सारिका पवार, ग्रा.प..सदस्या निलम थळे, शुभांगी भगत,रूपाली पाटील, सजणा नाईक, संतोष बोले तसेच माजी सरपंच सिताराम भगत, माजी सरपंच सरिता भगत आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाडगाव ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी यावेळी एकूण 400 वृक्ष रोपटयांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये अंबा,काजू, आवळा, सिसवं, करंज, खैर, जांभुळ, भावाहा आदी वृक्ष रोपटयाचा समावेश होता अशी माहिती उपसरपंच जयेंद्र भगत यांनी दिली.
तसेच राजिप शाळा वाडगाव येथे विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी रा.कॉ. तालुका अध्यक्ष तथा वाडगाव ग्रा.प.उपसरपंच जयेंद्र भगत यांचेसह सरपंच सारिका पवार, ग्रा.प..सदस्या निलम थळे, शुभांगी भगत,रूपाली पाटील, सजणा नाईक, संतोष बोले तसेच माजी सरपंच सिताराम भगत, माजी सरपंच सरिता भगत आदीसह वाडगाव राजिप शाळा मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शाळा समिती अध्यक्ष, व सदस्य आदीसह मोठया संख्येने विदयार्थीवर्ग उपस्थित होता.
यावेळी वाडगाव ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण व राजिप शाळा वाडगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम राबविताना रा.कॉ. राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार वाढदिवसाचे निमित्ताने सामाजीक बांधिलकी जोपासली असे उपसरपंच जयेंद्र भगत यांनी म्हटले.
