साळाव जेएसब्लू कंपनी काटा गेट समोरील रस्ता खड्डात रस्ता नुतनीकरणाचे नावाखाली ठेकेदारांची मलमपट्टी पावसात गेली वाहून
साळाव जेएसब्लू कंपनी काटा गेट समोरील रस्ता खड्डात
रस्ता नुतनीकरणाचे नावाखाली ठेकेदारांची मलमपट्टी पावसात गेली वाहून
साळाव सामाजीक कार्यकर्ते सय्यद खान यांनी लक्ष्य वेधले
रेवदंडा-महेंद्र खैरे-ठेकेदारानी काही दिवसांपुर्वी रस्ता नुतनीकरणाचे नावाने केलेली मलमपट्टी ऐन पावसात वाहून गेल्याने साळाव जेएसडब्लू कंपनी काटा गेट समोरील रस्ता पुर्णतः खड्डात गेला असून अपघातास निमत्रंणच असल्याचे लक्ष्य साळाव येथील सामाजीक कार्यकर्ते सय्यद खान यांनी वेधले आहे.
मुरूड तालुक्यातील साळाव येथील जेएसडब्लू कंपनी काटा गेट समोरील रस्ताची पावसाळयापुर्वी ठेकेदारानी रस्ता नुतनीकरणाचे नावाखाली डागडूजी करून मलमपट्टी लावली होती. या रस्ता नुतनीकरणाकडे संबधीत सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणत्याही प्रकारे लक्ष्य दिले नव्हते, परिणामी रस्ताला मलमपट्टी करून ठेकेदारांनी पोबारा केला होता. त्यामुळे नुतनीकरणाचे नावाखाली मलमपट्टी करण्यात आलेला रस्ता ऐन पावसाळयात टिकू शकला नाही. ऐन पावसात नुतनीकरण करण्यात आलेला मलमपट्टीचा रस्ता वाहून गेल्याने साळाव जेएसडब्लू कंपनी काटा गेट समोर खड्डेच खड्डे पडले आहे, व जिकडे तिकडे पावसाचे पाणी साचून तळी निर्माण झाली आहे. या पाण्याची तळी असलेल्या खड्डेमय ररत्यातून लहान मोठी वाहने जा-ये करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
साळाव जेएसडब्लू कंपनी काटा गेट समोरील रस्ताची पावसाळयापुर्वीच दुरावस्था झाली होती. या साळाव ते तळेखार रस्ताचे दुरूस्ती व नुतनीकरण संबधीत खात्याने पावसाळयापुर्वी करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने विशेष लक्ष्य न दिल्याने ठेकेदारानी साळाव जेएसडब्लू कंपनी काटा गेट समोर मलमपट्टीने दुरूस्ती व नुतनीकरण केले, त्यामुळे पावसात हा रस्ता टिकू शकला नसल्याने मलमपट्टी वाहून गेली व पुर्वीचा दुरावस्थेतील रस्ता जैसे थे झाला आहे.
या रस्तात मोठे मोठे खड्डें पडले असून या खड्डात पावसाचे पाणी साचल्याने तळी निर्माण झाली आहे. वाहनांना जा-ये करताना खड्डाचा खोलीचा अंदाज येत नसल्याने लहान मोठया वाहनाच्या अपघातास निमत्रंणच आहे. विशेषतः दुचाकी व तिनचाकी तसेच लहान चार चाकी वाहनांना येथून प्रवास करणे त्रासदायक ठरते.
या रस्ता मार्गात नजीकच शैक्षणिक संकुल आहे, तसेच या मार्गानेच रेवदंडा व अलिबागकडील महाविदयालयीन विदयार्थीवर्ग तसेच बिर्ला मंदिर येथे भाविक व पर्यटक तसेच चणेरा, रोहा कडे जा-ये करणारी वाहने यांची नित्याने रेलचेल असते. त्यामुळे या रस्ताच्या दुरूस्तीसाठी संबधीतानी तातडीने लक्ष्य दयावे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.