मुरूड पं.स.माजी सभापती चंद्रकांत मोहिते यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश
आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मुरूड तालुक्यात पुनस्यः दणका.
मुरूड पं.स.माजी सभापती चंद्रकांत मोहिते यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश
रेवदंडा-महेंद्र खैरे-शिवसेना उबाठाचे कट्टर व निष्ठावान म्हणून ओळख सांगणारे मुरूड पं.स.समितीचे माजी सभापती चंद्रकांत मोहिते यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला त्यांचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी भगवी शाल परिधान करून स्वागत केले.
अलिबाग राजमळा येथील आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे निवासस्थानी कार्यालयात मुरूड पं.स. माजी उपसभापती व माजी सभापती क्रियाशील राहिलेले चंद्रकांत मोहिते यांच्या शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचेसह शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, मुरूड तालुका शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे, मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ, उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, अशोक धुमाळ, उपतालुका प्रमुख मनोज कमाने, सि.एम.ठाकूर, महेश भगत, दिनेश मिनमिने, महिला तालुका प्रमुख निर्मला वाघीलकर, सुरेश ठाकूर, विभाग प्रमुख भारत मोती, जयेश म्हात्रे, विलास दिवेकर, युवासेना तालुका प्रमुख अमोल लाड, किशारे धामणस्कर,उदे्दश वाडकर, आदी मुरूड शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
मुरूड तालुक्यातील वळके पंचायत समिती गणातून चंद्रकांत मोहिते यांनी अनेकदा निवडणुक लढवित एकहाती विजय मिळविला आहे, त्यांनी मुरूड पंचायत समिती माजी उपसभापती व माजी सभापती म्हणून कार्यभार वाहिला आहे. मागील राजकीय उलटफेर मध्ये ठाकरे यांच्या पांठिशी राहीले व उबाठा शिवसेनेचे ते निष्ठावान व कट्टर म्हणून मुरूड तालुक्यात कार्यरत होते. परंतू आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर व विकास कामाच्या करिश्माने त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर विश्वास दर्शवित शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
यावेळी मुरूड शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत आमदार महेंद्र दळवी यांनी चंद्रकांत मोहिते यांना भगवी शाल परिधान करून पुष्पगूच्छ प्रदान केले व शिवसेनेत स्वागत केले. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोश केला तसेच चंद्रकांत मोहिते यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.