रेवदंडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
रेवदंडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे-नव्यानेच उभारलेल्या जीम परिसरात रेवदंडा ग्रामपंचायतीचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला.
या प्रसंगी रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्ल मोरे, उपसरपंच मंदाताई बळी, ग्रा.प.सदस्य दुशांत झावरे, प्रसाद गोंधळी, हर्षल घरत, भारती मोरे,धनजंय कोंंडे, ग्रा.प.कर्मचारी सुभाष मानकर,सचिन मयेकर शहानु शानवाज, रवी देवकर, विजय बांदिवडेकर, गौरी मोरे, आदीची उपस्थिती होती.
या वृक्षारोपण कार्यक्रमास रेवदंडा ग्रामपंचायतीचे वतीने एकूण 200 वृक्ष रोपटयाची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, काजू, आवळा, सिसवं,करंज खैर, जांभूळ भावाह आदी वृक्ष रोपटयाचा समावेश होता असे ग्रा.प. कर्मचारी सचिन मयेकर यांनी माहिती दिली.
प्रारंभी रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्ल मोरे व उपसरपंच मंदाताई बळी यांचे शुभहस्ते वृक्ष रोपटे लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा आनंद घेतला. रेवदंडा समुद किनारी नव्यानेच उभारलेल्या जीम परिसराचे सुशोभिकरणाचे हेतूने व वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याने रेवदंडा ग्रामपंचायतीचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला असे ग्रा.प.सदस्य दुशांत झावरे यांनी म्हटले.