कोर्लई चढाव रस्ताचा सरंक्षीत कडढा ढासळला

कोर्लई चढाव रस्ताचा सरंक्षीत कडढा ढासळला, वाहनांस एकमार्ग, तरीही धोकादायक
रेवदंडा-महेंद्र खैरे-ऐन पावसात कोर्लई चढाव रस्ताचा सरंक्षीत कडढा ढासळल्याने, रस्ता वाहनांसाठी एकमार्ग खुला ठेवण्यात आला आहे, मात्र चढाव रस्ता ढासळला असल्याने तेथून वाहने जा-ये करणे धोकेदायक परिस्थिीतीचे चित्र दिसते.
मुरूड तालुक्यातील पहिला चढावाचा कोर्लई येथे लागतो, कोर्लई डोंगरातून मुरूड कडे जाणारा रस्ताला सरंक्षीत कडढे बांधण्यात आले होते. परंतू ऐन पावसाळयात डोंगरातील मातीची दरडी घसरून चढावा बांधण्यात आलेल्या सरंक्षीत कडढा ढासलला असल्याने वाहतुकीस धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथून ढासळलेल्या सरंक्षीत कडढा परिसरातून एकमार्गी वाहतुक सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र पावसाचे प्रमाण जास्त झाले तर डोंगरातील रस्ताच्या बाजूच्या सरंक्षीत कडढा ढासळून पडलेली दरड आणखीनच पसरण्याची व कोसळण्याची संभवना असून रस्ता मुरूडकडे जाणारा रस्ता पुर्णतः बंद होण्याची शक्यता आहे.
मुरूड तालुक्यातील वाहतुकीचे महत्वाचे ठिकाण असलेल्या कोर्लई डोगरांतील रस्ताचा कडढा त्वरीत दुरूस्ती व नुतनीकरण होणे गरजेचे असून संबधीत खात्याने दुर्लक्षीत केल्यास हा रस्ता बंद होईल व संपुर्ण मुरूड तालुक्याकडे जा-ये होत असलेली वाहतुक खुप मोठा वळसा घेउन सुपेगाव मार्गे करावी लागेल त्यामुळे प्रवासीवर्गास व वाहनास त्रासदायक ठरून खर्चीत होईल.
सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अधिकारी सुखदेवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गोरे, राठोड यांनी पहाणी केली व ढासलेली सरक्षंण भिंतीचा कडढा त्वरीत बांधकाम करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसे पदाधिकारी राजेश तरे यांची उपस्थिती होती.